23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeउद्योग*महिंद्रा OJA ट्रॅक्टर्सच्या डिलिव्हरीजना लातूरमधून सुरुवात*

*महिंद्रा OJA ट्रॅक्टर्सच्या डिलिव्हरीजना लातूरमधून सुरुवात*

• ■ ग्लोबल ट्रॅक्टर डिझाईन हे, 4WD स्टॅन्डर्ड असलेल्या OJA श्रेणीचे वैशिष्ट्य आहे. ■
• ◆कारमध्ये असतात तशा अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज

■ OJA श्रेणीमध्ये PROJA, MYOJA & ROBOJA हे तीन तंत्रज्ञान पॅक आहेत जे भारतात पहिल्यांदाच सादर केले जात आहेत.■
• ◆कर्जसुविधांचे आकर्षक पर्याय आणि स्टॅन्डर्ड म्हणून ६ वर्षांची वॉरंटी

लातूर -भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने महिंद्राचा नवा, वजनाला हलका ट्रॅक्टर – महिंद्रा OJA च्या डिलिव्हरीजना लातूरमधून सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर डिलिव्हरीजना सुरुवात करण्यात आली असून गणपती विशेष ‘महिंद्राओजाचीवारी, अष्टविनायकाच्याद्वारी’ मध्ये देखील OJA झळकणार आहे. यामध्ये अभिनेते श्री अजय पुरकर यांच्या सह महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायकांच्या दर्शन यात्रेचे नेतृत्व OJA करणार आहे. महाराष्ट्रात डिलिव्हरीज स्वीकारणाऱ्या सर्व ग्राहकांना स्थानिक टीव्ही चॅनेल्सवर दिसण्याची देखील संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील लातूरमधील महिंद्राचे प्रमुख डीलर, लक्ष्मी मोटर्स (लातूर आणि औसा) यांनी गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर नवे महिंद्रा OJA ट्रॅक्टर्स ग्राहकांना सुपूर्द केले.

महिंद्राचे हे नवे ट्रॅक्टर्स प्रत्येक बाबतीत जागतिक दर्जाचे आहेत. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी विकसित करण्यात आलेली महिंद्रा OJA श्रेणी बनवताना देशभरातील हजारो शेतकऱ्यांकडून मिळालेले प्रतिसाद गंभीरपणे विचारात घेण्यात आले आहेत. फलोत्पादन आणि द्राक्षांच्या शेतीवर विशेष लक्ष केंद्रित करून विकसित करण्यात आलेल्या या श्रेणीला आमचे सहयोगी व शेतकऱ्यांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात OJA ट्रॅक्टर श्रेणीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.

ट्रॅक्टर तंत्रज्ञानाची जागतिक मानके आणि आधुनिक डिझाईन यामुळे OJA ट्रॅक्टर्स इतरांपेक्षा सरस ठरले आहेत. Automatic PTO, automatic – implement lift and drop, automatic – one-side braking, 4WD (four-wheel drive) as standard यांचा समावेश असलेली OJA श्रेणी उत्कृष्ट पकड व प्रगत ट्रॅक्टर कामगिरी प्रदान करते. OJA चे इंजिन तंत्रज्ञान जागतिक दर्जाचे असून ट्रॅक्टर अतिशय दमदार कामगिरी बजावतात, सहजसोपे संचालन व उत्कृष्ट कामगिरी यामुळे शेतीतील अनेक वेगवेगळ्या कामांसाठी OJA सुयोग्य आहे.

आधुनिक डिझाईन आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प्समुळे OJA ट्रॅक्टर्स दिसायला तर चांगले आहेतच शिवाय रात्रीच्या वेळी देखील ऑपरेटरला अधिक चांगली व्हिजिबिलिटी मिळवून देतात. कारप्रमाणे keyless tractor start-stop technology, adjustable seat, and steering system या वैशिष्ट्यांचा समावेश OJA ट्रॅक्टर्समध्ये करण्यात आल्यामुळे बरेच तास देखील ट्रॅक्टर आरामात चालवता येतो.

स्टॅन्डर्ड ६ वर्षांची वॉरन्टी सोबत दिली जात असल्याने OJA चे शक्तिशाली तंत्रज्ञान अधिक मजबूत झाले आहे. ९०% पर्यंत वित्तसुविधा आणि कमी व्याजदर यामुळे नवीन OJA ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे.

शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढावी यासाठी OJA श्रेणीमध्ये ३ टेक्नॉलॉजी पॅक आहेत, यामध्ये भारतीय शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच सादर करण्यात येत असलेली अनेक तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]