24.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeराजकीय*माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*

*माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*


लातूर/प्रतिनिधी ः- निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस निलंगा मतदारसंघासह जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आ.निलंगेकर जिल्ह्यात नसतानाही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थनाकडून जवळपास 400 ते 450 सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त घेण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत जिल्हावासीयांच्या ऋणात राहण्याची ग्वाही दिली.


जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा 20 जून रोजी वाढदिवस असतो. यानिमित्ताने निलंगा मतदारसंघासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आ. निलंगेकराचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी विधानपरिषदेच्या मतदानामुळे माजी मंत्री आ. निलंगेकर हे मुंबई येथे असल्याने ते जिल्ह्यात वाढदिवसासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून अक्का फाऊडेशनच्या वतीने दृष्टी अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून नेत्रतपासणीचे शिबिर 45 पेक्षा अधिक ठिकाणी घेण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असणार्‍यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गरजूंसाठी चष्मेही देण्यात येणार आहे.

या अभियानाचा शुभारंभ निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथून करण्यात आला आहे. या अभियानाचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिनी म्हणजेच 17 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे. हे अभियान तब्बल 91 दिवस सुरु राहणार आहे. निलंगा भाजपाच्या वतीने निलंगा येथील ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वरास महाअभिषेक करून आ. निलंगेकरांच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर सर्वधर्मियाचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत दादापिर व पिरपाशा दर्गा येथे चादर चढविण्यात आली.

निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन ही करण्यात आले. त्याचबरोबर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी फळे वाटपही करण्यात आली. निलंगा शहरातच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. निलंगा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यातही विविध ठिकाणीही वेगवेगळे उपक्रम आ. निलंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, वारकर्‍यांसाठी अन्नदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार, साखर व पेढे वाटप, महिला बचत गटांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत, शेतकर्‍यांना खरीपाच्या पेरणीसाठी बियाणांसह खताचे वाटप यासह विविध देवस्थांनाच्या ठिकाणी महाअभिषेक, महाआरती यासह महाप्रसादाचे वाटप आदी उपक्रमांचा समावेश होता.


लातूर भाजपाच्या वतीने लातूर शहरात ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदीरात महाअभिषेक, गोलाई येथील देवीची महाआरती, सर्वधर्मियांचे श्रद्धांस्थान असलेल्या सुरतशहावली दर्गास चादर अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप, रुग्णांना फळे व भोजन, शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये आवश्यक वस्तूंचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर, दिव्यांगाना साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, शहरातील विविध भागांमध्ये आरोग्य शिबिरे, ई-श्रम कार्ड वाटप, तुळशी रोपांचे वाटप, विविध विकास कामांचे लोकार्पण, ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार, ज्येष्ठ नागरीकांसाठी छत्री तर विद्यार्थ्यांसाठी रेनकोट वाटप आदी उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी लोकहितांचे सामाजिक उपक्रम व गरजूंसाठी आवश्यक साहित्य वाटप आदी कार्यक्रम आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील पदाधिकारी व निलंगेकर समर्थकांनी तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीस महाअभिषेक व महाआरती करून आ. निलंगेकर यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर हे विधानपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने मुंबई येथे असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना वेगवेगळ्या माध्यामातून शुभेच्छा देण्यासाठी जवळपास 400 ते 450 उपक्रम हाती घेतल्याने आजही आ. संभाजी पाटील निलंगेकर हे जनतेच्या मनातील पालकमंत्री आहेत असे वातावरण जिल्हाभरात पहाण्यास मिळाले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्या-त्या भागातील भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते व आ. निलंगेकर यांच्या समर्थकांनी परिश्रम घेतले.


जिल्हावासियांच्या कायम ऋणात राहणार-आ. निलंगेकर
विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने आ. संभाजी पाटील निलंगेकर मुंबई असल्याने जनतेचे आर्शिवाद व शुभेच्छा घेण्यासाठी जिल्ह्यात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळेच आ. निलंगेकर यांनी सायं. 5 वा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हावासियांशी संवाद साधला. या संवादादरम्यान आ. निलंगेकरांनी जिल्हावासियांच्या शुभेच्छा घेण्यासाठी उपस्थित राहू न शकल्यामुळे दिलगिरी व्यक्त करत सर्वसामान्य जनतेच्या शुभेच्छा माझ्यसाठी या उर्जादायी आणि आर्शिवादरुपी असल्याचे सांगितले. जनतेच्या आर्शिवादामुळे आपला आजपर्यंतचा राजकीय प्रवास यशस्वीपणे पार पाडू शकलो असून आगामी काळात आपला आर्शिवाद व प्रेम माझ्यासोबतच रहावे असे आवाहन केले. जनतेचे पाठबळ व आर्शिवाद यामुळेच आपण वेगवेगळ्या पदापर्यंत पोहचू शकलो असून या पदाचा अधिकाधिक लाभ जनतेला देण्यासाठी आपण बांधील असल्याचे सांगितले. जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांचे ऋण व्यक्त करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आगामी काळात सर्वसामान्यांच्या ऋणात राहत जनतेच्या हितासाठी बांधील राहू अशी ग्वाही यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]