
● श्री गुरूजी आयटीआय माजी विद्यार्थींचा उपक्रम●
लातूर ;
श्री गुरूजी आयटीआय मध्ये माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लातूरचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या हस्ते व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक उदय पाठक याच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी संघटनेच्या फलकाचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले.

कतृत्व-वक्तृत्व-नेतृत्व हे संघटनेच्या ब्रिद वाक्यतील गुण विद्यार्थ्यांनी आवगत करावेत असे उदगार भातलवंडे यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश सेलुकर, सचिव ऋतीत वाघमारे संस्था अध्यक्ष अतूल ठोंबरे,उदय पाठक उपस्थित होते.
भातलंवंडे यांचे स्वागत प्रा.संजय अयाचित व संघटना अध्यक्ष महेश सेलूकर तर उदय पाठक यांचे स्वागत शालेय समिती अध्यक्ष शांतारामजी देशमुख व संघटना सचिव ऋतीक वाघमारे यांनी शाल पुष्पगुच्छ, पुष्पहार देऊन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.व्ही.देशमुख सर यांनी केले . गजानन भातलवंडे व उदय पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अतुल ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन संजय अयाचित यांनी केले.

रविकांत मार्कंडेय, दिपाली महालंग्रेकर , बाबा डोंगरे सर, होळकर सर, चौधरी सर, समर्थ पिंपळे सर , अजय होलगे सर, शंकर वलसेसर यांची विशेष उपस्थिती होती.
गगण बायस, अदित्य शास्त्री, विष्णू शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले




