लातूर -दि. 10/12/2022 वार शनिवार रोजी श्री. लाल बहादूर शास्त्री विद्यालय लातूर येथे 1997-1998 च्या दहावी च्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे केले आयोजन.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा या उक्तीतून सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंनावंदन केले व स्वागत गीता ने सर्व गुरूवर्यांचे स्वागत करण्यात आले .
शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक श्री. गिरवलकर सर यांनी अध्यक्ष स्थान भुषवले व श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन केले व सौ. साखरे मॅडम यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. यावेळी श्री.स्वामी सर (माजी मुख्याध्यापक) श्री. टेकाळे सर,श्री.बिराजदार सर, श्री. सांडे सर, श्री. सांळुंके सर, श्री. हरनाळे सर तसेच पाटील मॅडम उपस्थित होते.नंतर कै.वाडकर सर व कै. भगत सरांना श्रद्धांजली देण्यात आली.
सुत्रसंचालनाची धुरा अश्विनी मळभागे व साळुंखे बालकृष्ण यांनी सांभाळली . जवळपास 24 वर्षांनी आपल्या शाळेत आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे बदलेले स्वरूप पाहिले पण शिक्षक एवढ्या वर्षांनी ही ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहेत आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड त्यांनी दिली आहे हे पाहून खूप आनंद व्यक्त केला. स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणीने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे त्यांच्या बाबतीत कसे सत्यात उतरले ते सांगितले कारण वेळोवेळी शिक्षा मिळाली व चुका सुधारत गेल्या व त्यामुळे या बॅचचे काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात , काही इंजिनिअर ,काही बॅंकेत ,काही आदर्श शिक्षक आहेत, काही चांगले उद्योगपती एवढेच नाही तर व्यक्तिमत्त्व विकास या शाळेत एवढा झाला कि एक विद्यार्थी नगरसेवक ही आहे . समाजकार्यात सहभागी असलेले विद्यार्थी हि आहेत हे स्वतः आपली ओळख देऊन माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याचीही ओळख करून दिली अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आई वडीलांचे कष्ट आशिर्वाद व शिक्षकांचे मिळालेले मोलाचे मार्गदर्शन हिच आपल्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी सुनील राठोड,प्रविण भडंगे यांनी सांगितले व मार्गदर्शन केले व त्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षकांनी ही माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शनाने सुजाता काळे हिने सर्व शिक्षकांचे पुनश्च एकदा आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.