*’माझं लातूर’ ची मोफत वारी १२०० भाविक प्रवाशांसह रविवारी होणार पंढरपूरला रवाना*

0
406

भाविकांना लागली विठुरायाच्या दर्शनाची ओढ

उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती

लातूर : माझं लातूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत पंढरपूर वारी आषाढी एकादशीला १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता नोंदणीकृत ११४७ भाविक प्रवाशी, ६० स्वयंसेवक, ३ रुग्णवाहिका आणि विक्रमी २२ ट्रॅव्हल्सने पंढरपूरकडे रवाना होतील.
याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह परिवाराच्या मार्गदर्शिका डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बळवंत जाधव, दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, डॉ. प्रमोद घुगे, डॉ. सदानंद कांबळे, आदित्य भुतडा, शाम तोष्णीवाल, उपक्रमास बिनशर्त सहकार्य करणारे सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नोंदणी केलेल्या सर्व ११४७ भाविक प्रवाशांनी सकाळी ठीक ६ वाजता अशोक हॉटेल येथील यशवंतराव चव्हाण संकुल येथे हजर राहावे असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी ५० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ३ रुग्णवाहिका, २ डॉक्टर, ४ नर्सिंग स्टाफ अत्यावश्यक औषधांसह ताफ्यात राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता सर्व भाविक प्रवाशांना घेऊन वारी परत लातूरकडे निघणार आहे. दरम्यान सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ, मास्क आणि सॅनिटायझरची सोय मोफत करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांनी वेळेवर उपस्थित राहावे, दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी विनंती माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, मदन केंद्रे, प्रविण पाटील, वाजीद शेख, नरेश घंटे, रवी अंबुज, काशिनाथ बळवंते, डॉ. सितम सोनवणे, तम्मा पावले, प्रमोद गुडे, संजय स्वामी, अभय मिरजकर, ऍड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दिपरत्न निलंगेकर, ऍड.राहुल मातोळकर, अभिजित पिचारे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here