निलंगा तालुक्यातील राठोडा गावात नातेस्नेहातील 2 वर्षांच्या चिमुकल्याला मातेनेच फेकले विहिरीत..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील राठोडा गावात दोन वर्षांच्या पोटच्या चिमुकल्याला सख्या मातेनेच विहिरीत फेकून दिल्याची ह्नदयद्रावक घटना सोमवारी उघडकीस आली आहे.दरम्यान,पाण्यात बुडाल्याने मुलाचा मृृृत्यु झाला असून,पोलीसांनी आरोपी मातेला अटक केली असून, पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते,अशी माहिती मिळाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,निलंगा तालुक्यातील राठोडा गावात रविवारी उशिरा हा प्रकार उघडकीस आला.सदर,आरोपी माया व्यंकट पांचाळ { वय 25 } हिला 2 वर्षाचा संपत व्यंकट पांचाळ हा मुलगा होता.पती व्यंकट पांचाळ हा मुलगा होता.पती व्यंकट पांचाळ हे लातूर येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत.रविवारी मुलगा घरात आढळून आला नाही.दरम्यान,घराशेजारील असलेल्या शिंदे यांच्या विहिरीत मुलाला मातेनेच फेकून दिले.
या घटनास्थळाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,पोलीस निरीक्षक बी.आर.शेजाळ,पोलीस उपनिरिक्षक गर्जे यांनी भेट दिली.व्यंकट विश्वनाथ पांचाळ यांच्या फिर्यादीवरून मयत बालकाची माता पांचाळ हिच्याविरूध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेकण्याचे कारण,अद्यापही समजेना…
मातेनेच आपल्या 2 वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.पतीने दिलेल्या फिर्यादीत,तसेच प्राथमिक माहितीमध्ये गुन्ह्यामध्ये कारण स्पष्ट झालेले नाही.पोलीसांनी सांगितले,आरोपी महिलेची मानसिक स्थिती बरी नाही का ? हे तपासात निष्पन्न होईल.

सोमवारी उघड झाली घटनाचक्र..
घराशेजारीच असलेल्या शिंदे यांच्या विहिरीत एका चिमुकल्या मुलाचा मृृृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.दरम्यान,याबाबतची माहिती निलंगा पोलीसांना देण्यात आली.तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.घटनाचक्रात अटक करण्यात आलेल्या मातेनेच गुन्ह्याची कबुली दिली आहे,असे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित कुदळे यांनी सांगितले.











