रमेश लांबोटे मिञमंडळाच्या वतीने विविध क्षेञातील मान्यवरांचा ” कोरोनायोध्दा ” म्हणून सत्कार संपन्न….
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील निटूर येथे सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध क्षेञातील उल्लेखनिय कामाबद्दल मान्यवरांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार करण्यात आला आहे.
कोरोनायोध्दा सत्काराप्रसंगी प्रमुख अध्यक्ष म्हणून शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके हे होते.तर,प्रमुख आतिथी म्हणून महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संगायोचे सदस्य सुरेंद्र धुमाळ,माजी पंचायत समिती सभापती अजित माने,निटूर गणातील पंचायत समिती सदस्य कालिदास पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.
संगायोचे सदस्य सुरेंद्र मुधाळ तसेच माजी पंचायत समिती सभापती अजित माने यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांची स्तुती केली आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांचा यथोचित सत्कार पोलीस निरीक्षक अंगद सुडके, माजी पंचायत समिती सभापती अजित माने,सुरेंद्र धुमाळ,पञकार असलम झारेकर,अँड.तिरूपती शिंदे यांनी केला आहे.
अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छानिमित्तांने मत-मतांतर मांडण्यात पोलीस निरीक्षक अंगद सुडके,अँड,तिरूपती शिंदे,पञकार अस्लम झारेकर,मोहन क्षिरसागर,मल्लिकार्जुन कोळ्ळे,राजकुमार सोनी यांनी आपले थोक्यात मनोगत व्यक्त केले.विविध क्षेञातील मान्यवरांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.कोरोना कालावधीतील हा कार्यक्रम नियमावलीनुसार संपन्न झाला.
यावेळी,मंचावर विविध क्षेञातील मान्यवरात उपसरपंच संगमेश्वर करंजे,गंगाधर चव्हाण,रोहीत बनसोडे, प्रमोद लोभे,रामलिंग पडसाळगे,पंकज भालके,मल्लिनाथ बुरकूले,प्रमोद मानकोसकर आदी जणांची उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड-19 च्या कालावधीमध्ये उत्कष्ट काम केल्यामुळे ” कोरोना योध्दा ” म्हणून विविध क्षेञातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यात शिरूरअनंतपाळचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके,पोलीस जमादार सत्यवान कांबळे,पञकारांमध्ये मोहन क्षिरसागर,शिवाजी काळे,परमेश्वर शिंदे,राजकुमार सोनी,मल्लिकार्जुन कोळ्ळे,के.वाय.पटवेकर,प्रशांत साळुंके,रविकिरण सुर्यवशी,माधव शिंदे,रमेश शिंदे,जावेद मुजावर,असलम झारेकर,नामदेव तेलंगे,मिलींद कांबळे यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.











