मीराताई संतोष महाजन यांना ” आदर्श सरपंच ” पुरस्कार जाहीर..
साकोळ आणि परिसरात अभिनंदनाचा वर्षाव..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील माजी सरपंच मीराताई संतोष महाजन यांना पुणे येथील सर्च मराठी फाऊंडेशन आणि मीडीया गुृृप संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.मिराताई महाजन हया ( सन 2015 ते 2020 ) आपल्या सरपंचपदाच्या कालावधीत साकोळ गावातील अंतर्गत रस्ते आणि अनेक ठिकाणी मियावाकी पध्दतीने वृृक्षारोपण व अंगणवाड्यांचे सुशोभिकरण आणि परिसर स्वच्छता अभियान आदींसह विविध कामे त्यांनी योग्य नियोजनाच्या जोरावर केले आहे.
तसेच,कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिनुसार त्यांनी प्रशासनाच्या नियमावलीनुसार गावात दवंडीव्दारे दक्ष राहण्यासाठी जनजागृृृृती अभियान राबविले होते.त्यांच्या कार्याची दखल पुण्याच्या संस्थेने घेतल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.येत्या 31 आँक्टोबरला पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे.











