*अरे …खरंच की….*
काल संध्याकाळी अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये मी 🚶🏻♂️Walk करत होतो. साधारण १५ मिनिटानंतर माझ्या शरीर मस्त त्या गतीशी Adopt झालं होतं.मी माझ्या धुंदीमध्ये चालत 🚶🏻♂️होतो.
अचानक एका महिलेच्या किंचाळीने माझी तंद्री तुटली.. मी आजूबाजूला पाहिलं.तर तो आवाज आमच्या वॉचमनच्या घरातून येत होता… मी घरात डोकावून पाहिलं तर वॉचमन दारू🥃 पिऊन बायकोला मारतात होता.
हे दृश्य पाहून माझ्या मनाला अतिशय दुःख झाला.कारण त्याची बायको त्याला त्याच्या दैनंदिन कामामध्ये खूप मदत करायची.त्यांना तीन मुले होती. त्या मुलांचा सांभाळ पण ती खूप व्यवस्थित करायची. अगदी मन लावून त्याच्यासोबत संसार करायची हे आम्ही जाता-येता पाहत होतो.

पण तो दारू पिऊन तिला मारत असलेला बघून वाईट🙁 वाटलं. एक वेळा वाटलं की आपण जाऊन ते थांबवावे.पण मी जाईपर्यंत तो आवाज थांबला होता आणि आता वातावरण शांत दिसत होतो.
मी चालत होतो पण माझं मन हाच विचार करत होतं ..
का मारत होता तो तिला?
अशाप्रकारे हे का वागत असतील?
त्या स्त्रीवरती,त्या मुलावरती याचा किती वाईट परिणाम होत असेल?

जसजसा विचार वाढत गेला तसं तसं माझं मन निराश होऊ😔 लागला. या विचाराच्या तंद्री मध्ये मी जवळपास पुढची वीस मिनिटं चालल्यावर … 📱व्हाट्सअप नोटिफिकेशन नी मी भानावर आलो… माझ्या एका ग्रुपचं नोटिफिकेशन होतं. त्यावर ती लिहिलेलं होतं.
*आपल्या पत्नीचा कॅन्सर नीट व्हावं यासाठी एका पतीने केलेल्या संघर्षाची ती स्टोरी होती*.👫🏻
स्टोरी वाचता वाचता माझं मन त्या दोघांमधील प्रेमामुळे आणि त्या पतीने तिच्यासाठी केलेल्या संघर्षाला पाहून भरून आलं.
निराश झालेल्या माझ्या मनाला पुन्हा एकदा उभारी आली आणि सकारात्मक वाटू लागलं.😊
चाळीस ते पन्नास मिनिटाच्या दरम्यान घडलेल्या या दोन गोष्टी.. याचा बारकाईने विचार केला तर माझ्या लक्षात आलं. आपल्या मनावर अनेक गोष्टींचा ताण येतो. तसंच ताण कमी करणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात.
आणि माझ्या मनाला मी म्हटलं *अरे खरंच की…*
जगामध्ये एकाचं क्षणाला प्रचंड निराशा देणाऱ्या व प्रचंड आशावादी बनवणाऱ्या दोन्ही प्रकारच्या घटना घडत असतात.त्यामुळे आपण निराश झालो तर लक्षात ठेवा.त्याच क्षणाला कुठेतरी कोणीतरी अतिशय सकारात्मक,आशादायी, प्रेरणादायी गोष्ट करत असतो.😊
ते आठवून आपण स्वतःला सावरू शकतो आपला ताण कमी करू शकतो.😇

संकलन
कपिल कुलकर्णी ,लातूर (Software Engineer)











