महाराष्ट्रातील खाटीक समाज
भवनसाठीजागा उपलब्ध करून द्या
अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडची मागणी
लातुर दि.१५जुलै २०२१ रोजी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाद्वारे नायब तहसीलदार श्री भीमाशंकर बोरूळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे,
ना बाळासाहेबजी थोरात,महसूलमंत्री, ना अमित विलासराव देशमुख ,वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री लातुर जिल्हा
ना धनंजय मुंढे , सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्रातील हिंदु खाटीक समाजाकारिता समाज भवन/सांस्कृतिक भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्यात हिंदु खाटीक समाज मोठया प्रमाणात सर्वदूर पसरलेला असून सद्यस्थितीत समाजाकरिता राज्यभर सामाजिक भवन अथवा सांस्कृतिक भवन उपलब्ध नाही. खाटीक समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गात ३१ क्रमांकावर येत असुन इतर अनुसूचित जाती प्रवर्गातील समाज बांधवांसाठी शासनाने शासकीय जागा वेळोवेळी समाज भवनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, महाराष्ट्रातील खाटीक समाजा करिता “गाव तेथे समाजभवन किंवा सांस्कृतिक भवनसाठी” शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी शिष्टमंडळात अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव अँड अमितकुमार कोथमिरे, प्रदेश संघटक दिगंबर कांबळे,गणेश सौदागर, महेश बिजापुरे, सुशील साबणे, अजय घोणे, ऋषिकेश डोंगरे, श्रीकांत गंगणे आदी उपस्थित होते निवेदनाची प्रत खा कृपाल तुमाने, रामटेक मतदारसंघ,नागपूर, आ राजुजी पारवे,उमरेड मतदारसंघ, नागपूर अॅड व्यकटराव बेंद्रे अध्यक्ष, महाराष्ट्र हिंदु खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटना आदींना पाठविण्यात आल्या आहेत











