नांदेड ; दि.२० ( प्रतिनिधी) —-
नांदेडची भूमीकन्या भार्गवी विकास देशमुख (कुलकर्णी) ही दि. 21-05-2023 रोजी कॅनडा व अमेरिका दोऱ्या साठी रवाना होत आहे.
जागतिक पातळी चा दर्जा असलेला ‘मुगल-ए-आजम’ हा कार्यक्रम कॅनडा व अमेरिकेतील तेरा राज्यांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आहेत फेरोज अब्बास खान. ते म्हणतात ‘रंगमंच ही अशी कला आहे जी कायम जिवंत असणार आहे .

नुकताच नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रांमध्ये भारतीय संगीतावर आधारित सिविलायजेशन टू नेशन हा कार्यक्रम देखिल फेरोज अब्बास खान यांनीच दिग्दर्शीत केला आहे तो भरभरून प्रतिसादा सह निता मुकेश अंबानी यांच्या जियो वर्ड ट्रेड सेंटरला अनेक प्रयोग घेत संपन्न झाला. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे अँकरींग, अजय अतुल यांचे संगीत, मनीष मल्होत्रा यांचे कॉसच्युमस, 300 ते 380 कलावंतांची मांदियाळी, स्वतः नीता मुकेश अंबानी यात सहभागी , समोर रसिकांमध्ये तर कोण नाही हेच म्हटलेले ठीक राहील .

या कार्यक्रमाच्या यशानंतर फेरोज सर आपला चमू घेऊन परदेश दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. 150 हून अधिक कास्ट-क्रु ला सोबत घेऊन मुगल- ए-आझम हा शानदार शो परदेश वारी करणार आहे. या कार्यक्रमाचा भार्गवी एक भाग आहे याचा आनंद नक्कीच आहे.
नांदेडमधून गुरु रमा करजगावकर यांचे कडे भार्गवीचे कथक चे नृत्याचे शिक्षण सुरू झाले ते बहरत गेले नाशिक मधील कीर्ती भवाळकर यांच्या कडून.नंतर पुणे ललित कला केंद्रा मधून गुरू शर्वरी जमेनिस (कथक नृत्यांगना व अभिनेत्री) यांचेकडे गुरुकुल पद्धतीतून शिक्षण घेत कथक नृत्याचे बीए, एम ए चे शिक्षण पूर्ण केले व कै. रोहिणी भाटे यांचे नावे असलेले सुवर्णपदक मिळविले.

पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्राचे सुवर्णपदक प्राप्त करणारी मराठवाड्याची भार्गवी ही पहिली आहे. गुरु शर्वरी जमेनिस यांचे सह अनेक नृत्यसंगीत संमलने,अनेक टी व्ही चॅनल शो, महाराष्ट्र भर दौरे केले. याच दरम्यान भार्गवी स्वतंत्र कार्यक्रमांसाठी देखील बाहेर जात राहिली. आणि आता मात्र मुगल-ए-आझम, सिविलायजेशन टू
नेशन या मुळे तर तीची नोंद जागतिक पातळीवर झाली ही नांदेड वासियांच्या साठी खूप अभिमानाची बाब आहे. यासाठी तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.