ह.भ.प.गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या चक्रीभजन आणि प्रवचनाने मुगांवकर भक्तीमय निनादात रंगले…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील मुगाव येथील कै.विठ्ठलराव सुर्यभान शिंदे यांच्या प्रथम वर्षश्राध्दाचे औचित्य साधुन ह.भ.प. गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या चक्रीभजनाने आणि प्रवचनाने यात भक्तगण भक्तीमय निनादात तळीन झाले होते.
ह.भ.प. गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या चक्रीभजनाचे औचित्य परिसरातील निटूरसह गावखेड्डयातील भक्तगणांची मोठी उपस्थिती दिसून आली.चक्रीभजन हे ह.भ.प.गुरूबाबा महाराज औसेकर ज्याठिकाणी असतात त्याठिकाणाहुन भक्तगण मोठ्यासंख्येने उपस्थिती असते हे विशेषत्त्वाने पाहावयास मिळाले.त्यानंतर,प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
मुख्य आयोजक भाजपाचे युवा नेते अशोक शिंदे,सतिष शिंदे व ओमप्रकाश शिंदे यांनी या चक्रीभजनाचे आणि प्रवचनाच्या माध्यमातून भक्तगणांना ही संधी प्राप्त करून दिली होती.म्हणून,भाजपाचे युवा नेते अशोक शिंदे हे दानशूर व्यक्तिमहत्त्व म्हणून त्यांची ओळख निटूर परिसरात आहे.सरळ आणि मनमिळावूपणाना ही त्यांची जमेची बाजू आहे हे विशेषत्त्वाने पाहिले जाते.
कै.विठ्ठलराव सुर्यभान शिंदे यांच्या प्रथम वर्षश्राध्दाचे औचित्य साधून दुसर्यादिवशी स्नेह-भोजनास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविद पाटील निलंगेकर यांची प्रमुख हजेरी होती.तसेच, भाजपा जिल्हा सचिव पंकज कुलकर्णी,विजय देशमुख,राजकुमार सोनी आदींची उपस्थिती याप्रसंगी होती.