| ◆पेपर रद्दी संकलनातून उभा केला निधी◆ ●परिसरातील मुला- मुलींना शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार● लातूर- सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी समाजातील वंचित घटकातील गरजू ,अनाथ लोकांसोबत दीपावली साजरी करत त्यांना दीपावली फराळ, अभग्यस्नान किट व साड्यांचे वाटप करण्यात आले. गेली ७ वर्षांपासून आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने शहरातील नागरिकास आवाहन करून त्यांच्या कडून पेपर रद्दीचे संकलन करून ती रद्दी विकून त्यातील जमा झालेल्या पैशामधून व आदर्श मैत्रीच्या संचालकाच्या सहकार्यातून दीपावली फराळ ,अभ्यंगस्नान किट व साडया बाभळगाव परिसरातील वैशालीनगर येथील २५० कुटुंबास वाटप करण्यात आले. या परिसराचा विकास हळू -हळू होत आहे. येथील सर्व झोपड्यांचे रुपांतर सिमेंटच्या पक्क्या घरामध्ये येणे गरजेचे आहे.हे परिवर्तन होण्यासाठी शिक्षण म्हत्तवाचे आहे. सोबतच येथील युवकांनी उद्योगात येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व मार्गदर्शन व सहकार्य आम्ही करू असे मत अभिजित देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार म्हणाले की , आपन सर्वजण आपली दीपावली थाटात साजरी करतो पण समाजातील काही घटक असा आहेत कि त्यांना सणच माहित नाही. अशा वंचित घटकांसोबत दीपावली अगोदर साजरी करून त्यांना वाटप , अभ्यंगस्नान किट व साडया भेट देऊन थांबणार नाहीत तर त्यांच्यात बदल घडवण्यासाठी या समाजाला पुढे येण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण आहे .या परिसरातील मुलगा – मुलगी अशिक्षित राहू नये त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना प्राथमिक माध्यमिक शिक्षणाबरोबर उच्चं शिक्षणासाठी मदत आदर्श मैत्री फाउंडेशनच्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी प्रा. शिवराज मोटेगावकर, शशिकांत पाटील तुकाराम पाटील, विवेक सौताडेकर आदिनी आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा ओमप्रकाश झुरुळे यांनी केले, या वेळी फाउंडेशनचे संचालक सचिदानंद ढगे, निलेश राजेमाने, विवेक ढगे, विशाल राठी, राघवेंद्र इटकर , प्रमोद भोयरेकर, दासराव शिरूरे, शशिकिरण भिकाने, कल्याण पवार, अनंत सूर्यवंशी, महेश शिंदे, प्रा उदय देशपांडे, प्रवीण सूर्यवंशी, संभाजी माळी, संभाजी नवघरे, श्रावण चव्हाण, असिफ शेख, अमोल जाणते मदन भगत, चंद्रशेखर गिरी, सूर्यकांत कठारे, येनगे, राहुल खुदासे, यांच्या सह आदर्श मैत्रीचे सर्व संचालक व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. |




