25.2 C
Pune
Thursday, December 18, 2025
Homeराजकीय'मोदी माफी मांगो ' लातूरात आंदोलन

‘मोदी माफी मांगो ‘ लातूरात आंदोलन

‘मोदी माफी मागो’ पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या

महाराष्ट्र विरोधी वकत्व्या विरोधात लातूर काँग्रेसचे आंदोलन

लातूर प्रतिनिधी : बुधवार दि फेब्रुवारी २२ :

   देशभर कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्राला जबाबदार धरणाऱ्या आणि मजुरांना कोरोनाचे स्प्रेडर ठरवणाऱ्या मोदींनी महाराष्ट्राची व मजुरांची ‘माफी मागावी’ यासाठी लातूर येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले आहे.  सर्वसामान्य कष्टकरी कामगार लोकांची मदत करणे जर गुन्हा असेल तर होय आम्ही काँग्रेसजनांनी तो गुन्हा केलाय आणि सर्वसामान्य मायबाप कष्टकऱ्यांसाठी आम्ही संकटकाळात वारंवार हा मदत करण्याचा गुन्हा करीत राहणार अशा शब्दात लातूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

  संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश आणि कोरोना मृत्यूची जबाबदारी टाळण्यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकार कोरोना वाढीस जबाबदार आहे, असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान घोर अपमान केला आहे. या उलट नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेऊन देशभर भाजप सरकारने कोरोना पसरवला आहे. मोदी आणि भाजपच्या वतीने याच काळात मध्यप्रदेशात सत्तापालट खेळ खेळला गेला. बिहार व इतर राज्यात मोठमोठ्या रॅली व प्रचार सभा घेण्यात आल्या. राहुल गांधींनी कोरोना अति धोकादायक आहे उपाययोजना करा म्हणून सांगितले पण त्यावेळी भाजप नेत्यांकडून त्यांची चेष्टा करण्यात आली. मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे काळजी न घेतल्यामुळे लाखो लोकांच्या मृत्यू कोरोनामुळे झाला, अनेक मुले अनाथ झाले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक रॅमिडिसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन कमी प्रमाणात देण्यात आला. कोरोना वाढल्यानंतर उपाययोजना करण्या ऐवजी दिवे लावण्याचा, टाळ्या वाजविण्याचा, थाळी वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यामुळे सारा देश गर्दी करत रस्त्यावर आला, अशातच अचानक लॉकडाऊन केल्यामुळे मजुरांचे हाल झाले, उपासमार झाली. पायी आपल्या गावी चालत निघालेल्या अनेकांनी आपले प्राण गमावले. या कठीण काळात काँग्रेस पक्ष आपल्या परंपरे प्रमाणे सामान्य माणसा सोबत राहून सर्वांना मदत केली. तरी देखील पंतप्रधान संसदेत खोटे बोलत आहेत याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.

   या आंदोलनात लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, अशोक गोविंदपूरकर, लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा.स्मिता खानापूरे, महिला काँग्रेस सहसचिव सपना किसवे, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, दगडूअप्पा मिटकरी, वर्षा मस्के, कल्पना मोरे, लक्ष्मी बटनपूरकर, सुलेखा कारेपूरकर, साहेरा पठाण, मिना टेंकाळे, मदाकीनी शिखरे, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, गोरबी बागवान, प्रा.संजय जगताप, इम्रान सय्यद, महेश काळे, ॲड.देविदास बोरुळे पाटील, प्रविण सुर्यवंशी, पुनीत पाटील, रमेश सुर्यवंशी, प्रा.प्रविण कांबळे, जालिंदर बरडे, ज्ञानेश्वर सागावे, असिफ बागवान, गौरव काथवटे, व्यकंटेश पुरी, दत्ता सोमवंशी, सुमित खंडागळे, प्रा.एम.पी.देशमुख, तबरेज तांबोळी, अजय मार्डीकर, बीबीषन सांगवीकर, सुंदर पाटील कव्हेकर, ॲड. बाबा पठाण, अफसरखान, प्रमोद जोशी, कुणाल वागज, कलीम शेख, यशपाल कांबळे, अभिजीत इगे, सिंकदर पटेल, जय ढगे, अराफत पटेल, युसुफ बाटलीवाला, बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे, अकबर मांडजे, पिष्णूदास धायगुडे, शैलेश भोसले, जफर पटवेकर, प्रसाद ढगे, अशीतोष मुळे, इसरार पठाण, युनुस शेख, धनराज गायकवाड, पवनकुमार गायकवाड, कलीम तांबोळी, अनिता कांबळे, सुरेश गायकवाड, अराफत पटेल, अक्षय मुरळे, गोविंद केंद्रे,श्रावण मस्के, मारूती बानाटे याच्यासह काँग्रेस पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]