लातूरसह राज्यात आरोग्यदायी शिबीर उपक्रमाचे आयोजन करावे
वैदयकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने
सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल
लातूर शहर वैद्यकीय सेवेचे केंद्र
आंतररार्ष्टीय दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देणार
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप
लातूर प्रतिनिधी : बुधवार दि. ३० मार्च २०२२ :
मोतीबींदूमुळे अंधत्व येणाऱ्या दृष्टीहीन रूग्णांची संख्या लक्षात घेता लातूरसह राज्यातील सर्व जिल्हयात महाराष्ट्राला ६० वर्षे व देशाला ७५ वर्ष होवून गेल्या बददल अशा आरोग्यदायी शिबीराचे उपक्रमाचे आयोजन करावे, त्यासाठी वैदयकीय शिक्षण आणि सार्वजनीक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येइल, तसेच लातूर शहर वैदयकीय सेवेचे केंद्र म्हणून पूढे येत आहे, त्यामूळे या ठिकाणी आंतररार्ष्टीय दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज बुधवार दि. ३० मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, मुंबईच्या नेत्रतज्ञ डॉ. रागिनी पारेख, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, मनपा आयुक्त अमन मित्तल, अधिष्ठाता सुधीर देशमुख, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. उदय मोहिते, डॉ. श्रीधर पाठक, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, एकनाथ पाटील, प्रवीण सूर्यवंशी, सोनू डगवाले, ओमप्रकाश झुरळे, बाबासाहेब गायकवाड, सचिन दाताळ, रमेश सूर्यवंशी, काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी रुग्णालयातील सर्व डॉक्टर रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक नागरिक उपस्थित होते. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या संकल्पनेतून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

संकल्प २१०० तिमिरातून तेजाकडे उपक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात दोन महिला व दोन पुरुष रुग्णांना पालकमंत्र्यांच्या हस्ते चष्म्यांचे वाटप करण्यात आले, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी ना. देशमुख यांनी केली.
तसेच जन्मदिनाचे औचित्य साधून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विशेष उपचार रुग्णालय येथे संपन्न झाले या बददल आनंद व्यक्त करून शिबिरात मदत केल्याबद्दल डॉ. तात्याराव लहाने व सर्व टीमचे आभार मानले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्याचा आराखडा तयार करावा अशी सूचना करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करून नेत्र शस्त्रक्रिया विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सदया कीडणीचे रूग्ण वाढत असून रुग्णांना पुणे-मुंबई येथे न जाता लातुरात त्या सुविधा उपलब्ध करून शासकीय महाविद्यालयात डायलेसिस वार्ड करण्याची सुरुवात करावी, महाराष्ट्राला ६० वर्षे व देशाला ७५ वर्ष झाले त्या निमित्ताने याप्रकारचे आरोग्यदायी उपक्रम घ्यावेत, मोतीबींदूमुळे अंधत्व येणाऱ्या दृष्टीहीन रूग्णांची संख्या लक्षात घेता लातूरसह राज्यातील सर्व जिल्हयात अशा शिबीराचे आयोजन करावे त्यासाठी वैदयकीय शिक्षण आणि सार्वजनीक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येइल, लातूर शहर वैदयकीय सेवेचे केंद्र म्हणून पूढे येत आहे त्यामूळे या ठिकाणी आंतररार्ष्टीय दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे पालकमंत्री ना. देशमुख यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी करून राबवण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिराची सविस्तर माहिती दिली, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ. रागिणी पारेख यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शिबिरात करण्यात येत असलेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे यांनी मानले
——————




