ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज समितीच्या वतीने डाॅ.इंदलकर मधुमेह,थायराईड आणि लठ्ठपणा क्लिनिकव्दारे तब्बल 131 रूग्ण मोफत तपासणी
जागतिक मधुमेह दिनानिमित्त शिबीराचे आयोजन..
निटूर,-( प्रतिनिधी )- निलंगा तालुक्यातील निटूर येथील ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज समितीच्या वतीने डाॅ.इंदलकर यांच्या मधुमेह,थायराईड,लठ्ठपणा क्लिनिकव्दारे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याशिबीरात निटूर पंचक्रोशीतील नागरिक,महिलांनी यांनी मोफत तपासणी करून 131 जणांनी लाभ घेतला आहे.

अविनाश स्वामी यांनी डाॅ.इंदलकर यांच्या कार्याची स्तुती करताना म्हणाले,सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून त्यांची ख्याती आहे.सोबतचं,त्याच्या सहकार्याची स्तुती करून या ग्रामदैवताच्या पावनभूमित आपण निटूर पंचक्रोशीतील 131 जणांवर मोफत तपासणी करून औषधोपच्चार केल्याने हा आमच्यासाठी मोठा योगायोग असल्याचे नमुद केले.
निटूर येथे डाॅ.इंदलकर यांच्या मधुमेह,थायराईड,लठ्ठपणा यावर मोफत तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरची टिम दाखल झाली होती.यामध्ये मोफत तपासणी करून पुठे पुटअपसाठी उपलब्ध सुविधेमध्ये मधुमेह,थायराईड,लठ्ठपणा यावर टेस्ट करण्यासाठी अल्प आकारणी करून अनेकांनी टेस्ट केल्या.तपासणी केल्यानंतर मोफत औषधोपचार देण्यात आले यात एकूण 131 रूग्णांनी लाभ घेतला आहे.
याप्रसंगी,पंकज कुलकर्णी,विजय देशमुख,बाळकृृष्ण डांगे,अंकुश कवडे,मल्लिनाथ बुरकूले,अविनाश स्वामी,सुरज स्वामी,दिलीप हुलसुरे,नंदकुमार हासबे आदी जणांची उपस्थिती होती.


