मसलगा येथे शिवजयंतीनिमित्त 200 जणांची मोफत दंत तपासणी
शिवजयंतीनिमित्त आधार ग्रुप च्या वतीने दंतरोग तपासणी शिबीर, वृक्षारोपण व कोरोना योध्यांचा सत्कार
निलंगा,-( प्रतिनिधी)-
तालुक्यातील मसलगा येथे शिवजयंती निमित्त आधार ग्रुप व एम.आय.डी.एस.आर.दंत महाविद्यालय व रूग्णालय,लातूर च्या वतीने दंतरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर एम.आय.डी.एस.आर.दंत महाविद्यिलय व रूग्णालय,लातूर चे शिबीर प्रमुख डॉ. विलास धुमाळ, डॉ. पुजा मुंडे, डॉ. सायली मोरे, डॉ. चैताली लोढा, अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, दिनकर पाटील, तंटामुक्ती चे अध्यक्ष मोहनराव पिंड, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पिंड, सोसायटी चे व्हा चेअरमन विलासराव पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोहन मोरे, मलीशे सर, माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, प्रमोद पिंड, माधवराव पाटील, दिलीपराव जाधव, माणिक पिंड, प्रकाश देशमुख, पांडुरंग साळुंके, भागवत पिंड आदीची प्रमुख उपस्थिती होती.

या दंत शिबीरात शालेय विद्यार्थी व नागरिक असे एकूण 200 जणांची तपासणी करण्यात आली.
आधार ग्रुपच्या वतीने आंगणवाडी परिसरात व गावात वृक्षारोपण करून अनेकांना वृक्ष भेट देण्यात आले. तसेच गावातील पत्रकार दैनिक सारथी समाचार चे निलंगा तालुका प्रतिनिधी माधवराव शिंदे, न्यूज लोकनायक चे निलंगा तालुका प्रतिनिधी रमेश शिंदे व साप्ताहिक लातूर रत्न चे संपादक रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर, ग्रामपंचायत चा सत्कार कर्मचारी सुरेंद्र जाधव, अंगद हलसे यांनी स्वीकारला, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर, कर्मचारी, आशा, आंगणवाडी ताई यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आधार ग्रुप चे आशीष पाटील,हारीदास साळुंके, सतीष पिंड,आदित्य पाटील, निखिल कुलकर्णी, अखिल सय्यद,मनोज पिंड,सिदिक सय्यद,श्रीप्रसाद पाटील,गजानन पिंड, आकाश जाधव, राहुल जाधव, हारी पिंड, पृथ्वीराज पाटील, अक्षय देशमुख, रिहान शेख, सलमान शेख, ॠतीक पाटील,सागर पाटील,अमर जाधव,मेघराज पाटील,दत्ता जाधव किशोर तोरखडे, केशव जगताप,रोहित जाधव,अजिंक्य देशमुख,हारून शेख, हर्ष जाधव, रवि पवार,दत्ता जाधव,प्रताप लव्हरे,सचिन पवार,सुरज पवार आदींनी शिवजयंतीनिमित्त उपक्रम राबवण्यासाठी परिश्रम घेतले.
