लातूर (प्रतिनिधी)
घनसावंगी येथे होणाऱ्या ४२व्या मराठवाडा साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ .शेषराव मोहिते यांचा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.
प्रसिद्ध लेखक , महाराष्ट्राच्या शेती चळवळीतील अभ्यासक ,शेतकरी चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते असलेले डॉ .शेषराव मोहिते यांचे नाव मराठी साहित्यात मोठे आहे.मसापच्या ४२व्या मराठवाडा साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची शुक्रवारी निवड घोषित करण्यात आली.त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल ९५ व्या अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्निक सत्कार केला.”मोहिते सरांच्या निवडीने लातूर जिल्ह्याचा गौरव तर झाला आहेच पण शेतकरी प्रश्नाचा अभ्यासक व तळमळीचा कार्यकर्ता निवडला गेल्याचा आनंद आहे” असे मत ना.बनसोडे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रा.पंडितराव सुर्यवंशी,कोळनूरचे सरपंच चोले उपस्थित होते.




