७०० हून अधिक शेतकर्यांनी घेतला याराच्या पहिल्या कमी खर्चातील तसेच पाण्यात विरघळणार्या खतांच्या प्रात्यक्षिकांचा लाभ
लातूर , जून २०२३- यारा इंडिया या यारा इंटरनॅशनल या नॉर्वेजियन कंपनीची उपकंपनी असलेल्या कंपनी तर्फे भारतातील महाराष्ट्रा मध्ये १ ते १२ जून २०२३ दरम्यान क्रॉप शोज चे आयोजन केले होते. जगभरांतील आघाडीची क्रॉप न्युट्रिशियन कंपनी आणि कृषी, औद्योगिक तसेच पर्यावरणीय उपाय प्रदाता कंपनी असलेल्या यारा ने यारा रेगा या पहिल्यांदाच अनोख्या अशा पाण्यात विरघळणार्या खतांची सुरुवात केली असून ही उत्पादने त्यांच्या सध्याच्या उत्पादन श्रेणी बरोबर उपलब्ध होणार आहेत. क्रॉप शोज चे आयोजन हे महाराष्ट्रातील बारामती, धानोली-कोल्हापूर, लातूर, श्रीरामपूर, करमाड आणि सांगली येथे करण्यात आले होते आणि यामध्ये स्थानिक स्तरावर पिकवली जाणारी पिके जसे केळी, ऊस आणि डाळींब यांसारख्या पिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि ७०० हून अधिक शेतकरी, ५० हून अधिक रिटेलर्स ने महाराष्ट्रातील ६ ठिकाणच्या शेतकर्यांनी भाग घेतला होता.
क्रॉप शोज च्या आयोजना मागील प्रमुख उद्देश हा होता की शेतकर्यांना यारा रेगा विषयी माहिती देऊन पिकांची उत्पादकता वाढण्या बरोबरच पोषक तत्वांचे नुकसान होऊ न देणे. त्याच बरोबर या शोज मुळे उत्पादनांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे होय. या उपक्रमामध्ये कशा प्रकारे यारा रेगा हे उत्पादन परपंरागत खतांचा पर्याय आहे आणि त्यांचा उपयोग करुन शेती कशी सोपी होते आणि त्यांचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या सिंचनात करता येऊ शकेल याबद्दल माहिती देऊन अगदी साधारण सेटअप पासून अत्याधुनिक सेटअप मध्ये कसा उपयोग होतो याची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर यारारेगा हे उत्पादन हे अन्य पाण्यात विरघळणार्या खतांपेक्षा कसे स्वस्त आहे हे समजावण्यात आले.

यावेळी बोलतांना यारा फर्टिलायझर्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कंवर यांनी सांगितले “ खरीप हंगामाच्या सुरुवातीला आमच्या यशस्वी अशा यारारेगा क्रॉप शो ची सांगता करत असल्याची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे. आम्ही नेहमीच नाविन्यपूर्ण, परिणामकारक उत्पादने आणून पिकांची उत्पादकता वाढवण्या बरोबर नैसर्गिक रित्या पिकांची वाढ करण्यासाठी उत्पादन उपलब्ध करुन देत असतो. यारारेगा हे आमचे नवीन पाण्यात विरघळणारे खत असून ते परवडणारे, वापरण्यास सोपे आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विविध ठिकाणी तयार होणार्या पिकांमधील पोषक मुल्ये टिकवणारे उत्पादन आहे. यामुळे उत्पादनात वाढ होऊन गुणवत्ता वाढून खतांचा वापर कमी करावा लागतो जेणेकरुन भारतीय शेतकर्यांच्या एकात्मिक पोषण कार्यक्रमासही यामुळे हातभार लागतो.”
१३ राज्यांतील १२५ कृषी उत्पादक संस्था (एफपीओज) बरोबर भागीदारी केल्यामुळे यारा इंडिया ने ६८ हजार शेतकर्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला असून डिजिटल चॅनलच्या माध्यमातून ११.८ दशलक्ष शेतकर्यांशीही संपर्क साधला आहे.




