तेरणा व मांजरा नदीकाठच्या शेतकर्यांच्या जमिनीत पाणी घुसण्यास पालकमंञीच जबाबदार- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदीकाठच्या शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे.गेल्यावर्षीच्या अतिवृृष्टीच्या कालावधीत पालकमंञ्यांसह डझनभर मंञ्यांनी शेती नुकसानीच्या पाहणीच्या नावाखाली केवळ पर्यटन म्हणून दौरे केले.मावेजा देण्याऐवजी शेतकर्यांच्या डोळ्यात धूळफेक केली,अशी टीका माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.

सध्या,निलंगातालुक्यातीलऔरादशहाजानी,सोनखेड,सावरी,तगरखेडा येथील तेरणा नदीकाठच्या शेतकर्यांच्या पूरपरिस्थितीची पाहणी करून माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी शेतकर्यांशी संवाद साधला.याप्रसंगी,भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,पंचायत समिती सभापती राधाबाई बिराजदार,भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे,शहराध्यक्ष राजा पाटील,डाॅ.मल्लिकार्जून शंकद,उपसरपंच महेश भंडारे,महेबूब पठाण आदी उपस्थित होते.माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर म्हणाले,मांजरा व तेरणा नदी संगमावर दर वर्षीच्या होणार्या नुकसानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने सीएम मार्फत प्रस्ताव मागविले असून नदीकाठी व्हाॅल टाकून कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करीत आहे.केंद्र सरकार नेहमीच शेतकर्यांच्या पाठीशी आहे,असेही माजी पालकमंञी तथा आ. निलंगेकर म्हणाले.

शेतकर्यांचे सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने दिपावलीपुर्वी नुकसानभरपाई द्यावी…
माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले,हवामान विभागाने दिलेल्या अतिवृृष्टीच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर मी प्रशासनास लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यातील अतिराक्त पाणी कालव्यामार्फत सोडण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच लेखी पञ देऊन सुचविले होते.माञ,जलनियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंञ्यांनी आजतागायत त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही.कार्यवाही झाली असती तर नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले नसते.पंचनामे न करता शेतकर्यांना दिपावलीपुर्वी नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणीही त्यांनी केली.












