गुरुनाथ मगे यांच्या उपस्थितीत युवकांचा भाजपात प्रवेश
लातूर/प्रतिनिधी समाजहिताला प्राधान्य देणार्या भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून सबका साथ सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनुसार सुरु असलेले लोकहिताचे काम यावर विश्वास ठेवत लातूरातील अनेक युवकांनी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. या युवकांचे पक्षात स्वागत करत पक्षाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन गुरुनाथ मगे यांनी यावेळी केले आहे.
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होऊन त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी प्राधान्य देऊन काम करणार्या भारतीय जनता पक्षाची विचारधारा सर्वसमावेशक असल्यानेच पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार अनेक लोकहिताचे निर्णय घेत असून या सरकारकडून देशहिताला प्राधान्य देण्यात येत आहे. या नेतृत्वावर विश्वास ठेवत लातूरातील युवकांनी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश करणार्यांमध्ये प्रतिक बेरकिले, शिवानंद शेटे, राजेश ढगे, शरद राचट्टे, संतोष पवार, धनराज प्रयाग, अनिल रेड्डी, वैभव राचट्टे, सागर चाकोते, शंकर रोडे, पवन ओझा, अमोल हुच्चे, सुमित स्वामी, प्रशांत सौदापुरे, अशिष अवाळे, सरफराज सय्यद, सुमित मिटकरी, अकाश भंडगे, विशाल राजपुत, किरण गायकवाड, मंगेश हुच्चे, दिपक जाधव, प्रसाद हलगे, गजानन सोळुंके, बबलु स्वामी, सुरज गुप्ता, गणेश बारगले, सचिन दोडके, शिवलिंग डांगे, प्रशांत डांगे, तानाजी घुगरे, नरेंद्र जावळे, आकाश नाकाडे, प्रतिक पवार, अमय प्रयाग, शिवम वाघमारे, रितेश होरे, असिफ फुलारी, अमित हालिंगे, वौभव नांगरे, शैलेश धायगुडे, पंडित चाकोते, विष्णुकांत घुगरे, समिर शेख, रितेश इंगळे, सोमेश घुगरे, हरिष जाजुनकर आदींचा समावेश आहे.
या युवा कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करून पक्षाची विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासह पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी प्रत्येकांने आपले योगदान द्यावे असे आवाहन करून पक्ष प्रवेश करणार्यांचा योग्य सन्मान करेल अशी ग्वाही यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी दिली. याप्रसंगी संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, सरचिटणीस अॅड. दिग्विजय काथवटे, महेश कौळखेरे, अजय भुमकर, सतिष ठाकूर, अॅड. ललीत तोष्णीवाल आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











