आजी आजोबांच्या स्मरणार्थ माता-पिता यात्रा उपक्रम ः शेकडो भाविकांना मिळणार विठ्ठल-रूक्मिनीचे दर्शन
लातूर दि.10-06-2022
प्रत्येकाला सामाजिक जीवनामध्ये जगत असताना जीवनात एकदा तरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे, अशी ईच्छा असते. पंरतु घरातील आर्थिक परिस्थितीमुळे भाविकांना ते शक्य होत नाही. पंरतु अशा शेकडो भाविकांचा शक्तीदाता म्हणून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर हे पुढे आले असून त्यांनी आजोबा व आजी यांच्या स्मरणार्थ प्रभाग 18 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडविण्याचा संकल्प केला असून गेल्या वर्षापासून शेकडो भाविकांना विठ्ठल-रूक्मिीनीचे दर्शन घडविण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे. त्याच धर्तीवर यंदाही 15 जून 2022 रोजी सकाळी 08 वाजता शहरातील चन्नाबसवेश्वर डी.फार्मसी कॉलेज माताजी नगर, कव्हा रोड येथून माता-पिता यात्रेची सूरुवात होणार आहे. त्यांच्या या सामाजिक व धार्मीक कार्याचा आदर्श इतर राजकीय क्षेत्रातील नेत्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून आजोबा बळवंतराव पाटील कव्हेकर व आजी सोजराबाई पाटील कव्हेकर यांच्या स्मरणार्थ प्रभाग 18 मधील ज्येष्ठ नागरिकांना विठ्ठल-रूक्मिनीचे दर्शन व्हावे या सामाजिक दृष्टिकोणातून 15 जून 2022 रोजी सकाळी 8 वा. चन्नाबसवेश्वर डी.फार्मसी कॉलेज माताजी नगर येथून माता-पिता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.नाथ संस्थान औसा तथा विठ्ठल-रूक्मिनी मंदिर देवस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिणीनाथ महाराज औसेकर हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन लातूरचे माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर लोकसभेचे खा.सुधाकर श्रृंगारे, जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपा प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य शैलेश लाहोटी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती शैलेश गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदास काळे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती दीपक मठपती, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, माजी नगरसेविका भाग्यश्रीताई शेळके, सरिता राजगिरे, कव्हा विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य सुभाषअप्पा सुलगुडले, श्रीराम मंदिर समितीचे अध्यक्ष जाफर पटेल, बालाजी शेळके, भाजपाचे शहर संघटक सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजपा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, दिग्वीजय काथवटे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडलाध्यक्ष रवि सुडे, महात्मा बसवेश्वर मंडलाध्यक्ष संजय गिर, छत्रपती शिवाजी महाराज मंडलाध्यक्ष शोभाताई पाटील, महर्षी दयानंद सरस्वती मंडलाध्यक्ष विशाल हवा पाटील, अहिल्यादेवी होळकर मंडलाध्यक्ष सतीष ठाकूर, छत्रपती संभाजी राजे मंडलाध्यक्ष ज्योतीराम चिवडे, सिध्देश्वर मंडलाध्यक्ष ललीत तोष्णिवाल, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनाताई भोसले, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवा गडदे, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय आवचारे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना हाश्मी, प्रताप शिंदे, भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर महांडूळे, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडेकर, भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अजय पाटील, भाजपायुमोचे लातूर सरचिटणीस अॅड.गणेश गोजमगुंडे, भाजयुमोचे सरचिटणीस शंभूराजे पवार, सागर घोडके, संतोष ठाकूर, महात्मा बसवेश्वर युवा मोर्चा मंडलाचे अध्यक्ष राजेश पवार, छत्रपती शिवाजी महाराज युवा मोर्चा मंडलाचे अध्यक्ष गणेश श्रीमंगले, छत्रपती संभाजीराजे युवा मोर्चा मंडलाचे अध्यक्ष प्रेम मोहिते, अहिल्यादेवी होळकर, युवा मोर्चा मंडलाचे अध्यक्ष काका चौगुले, सिध्देश्वर युवा मोर्चा मंडलाचे अध्यक्ष रविशंकर लवटे, महर्षि दयानंद सरस्वती युवामोर्चा मंडलाध्यक्ष धनंजय आवस्कर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे कै.बळवंतराव पाटील कव्हेकर व सोजरबाई पाटील कव्हेकर यांच्या स्मरणार्थ काढण्यात येणार्या माता-पिता यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे.
—————————————————–
प्रति





