भाजपाच्या जिल्हा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
लातूर दि.१० – भारत मातेच्या रक्षणासाठी नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरीता देशवासीय सज्ज असून प्रत्येकाच्या मनामनात मोदीच आहेत. येणार्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मनपा या सर्व निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याचा संकल्प करावा असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर येथील मेळाव्यात बोलताना केले.

लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक जिल्हा मेळावा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दुपारी दयानंद सभागृहात झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रा. किरण पाटील, शालीनीताई बुंदे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, प्रा. प्रेरणा होनराव, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, किसान मोर्चाचे शिवाजीराव पाटील कव्हेकर, धर्माजी सोनकवडे, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, रामचंद्र तिरुके, दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, बापूराव राठोड, बालाजी गवारे, उत्तरा कलबुर्गे, मिनाक्षी पाटील, शामल कारामुंगे आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.

आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असून या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जगातील १५० देशांनी सर्वोत्तम नेता म्हणून मान्य केले आहे. या पक्षाचे आपण भाग्यवान कार्यकर्ते आहोत. पक्ष आहे म्हणून सन्मान, प्रतिष्ठा आहे ही टिकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत असले पाहिजे असे सांगून आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील ४८ लोकसभेच्या आणि २०० प्लस विधानसभेच्या जागा जिंकण्याचा संकल्प भाजपाने केला असून ईना-मिना-डिका (मशाल-हात-घड्याळ) कितीही एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही.


एक कमळाला मत मिळाल्याने देशाला नरेंद्रजी मोदी यांच्या रुपाने सर्वोत्तम नेता मिळाला या नेतृत्वाने जगात देशाची शान आणि मान उंचावली. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी नतमस्तक झाले आणि राज्य घटनेला ग्रंथ माणून कार्य सुरु केले वर्षानूवर्ष प्रलंबित असणारे ३७० कलम राममंदिर यासह विविध प्रश्न सहजतेने निकाली काढले. देशाला आत्मनिर्भर बनविले, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरु केल्या, गोरगरीब-सर्वसामान्य माणसाला दिलासा देणार्या अनेक योजना सुरु केल्या असल्याचे सांगून आ. बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सत्तेला लाथ मारुन मर्द मराठा एकनाथ शिंदे बाहेर पडले. आज राज्यात खर्या अर्थाने भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेवर आले असून या सरकारने एक रुपयात शेतीचा पीकविमा, लखपती होवून आता मुलगी जन्म घेणार यासह अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. भाजपाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घर चलो अभियानात सक्रियतेने सहभागी व्हावे पक्षाचे सर्व कार्यक्रम उपक्रम प्रभावीपणे राबवावे असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता हा पक्ष संघटनेसोबत मजबुतीने उभा आहे. जेंव्हा-जेंव्हा काँग्रेस सोबत निवडणूकीत दोन हात करण्याची वेळ येते तेंव्हा भाजपाचे सर्वजण एक ताकतीने एक जिद्दीने आणि दिलाने कार्यरत असतात. कार्यकर्त्याच्या बळावरच गेल्या वेळी जिप, पस, नप, मनपा या सर्व निवडणूकीत झिरो टू हिरो याप्रमाणे भाजपाने घवघवीत यश संपादन करुन लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला निर्माण केला. येणार्या काळात सर्व विधानसभे बरोबरच लातूर लोकसभेची जागा मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडूण येणार असे बोलून दाखविले.

भाजपाच्या जिल्हाभरातील कामाची माहिती देवून आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यात सत्ता आली मात्र अजूनही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली नाही अशी खंत व्यक्त केली. भाजपाच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाने भरीव मदत करावी, कार्यकर्त्यांना सक्षम करावे, बळ द्यावे, निश्चितपणे प्रदेश जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पाडू. येणार्या काळात जिल्ह्यातील सर्व विधानसभा आणि लोकसभा बहुमतांनी जिंकू. लातूर जिल्ह्यात भाजपाचे यापूढेही प्राबल्य राहील. नेत्यांनी ढाल घेतली कार्यकर्ता तलवार घेवून उभा राहील यात शंका नाही असे यावेळी बोलून दाखविले. यावेळी खा. सुधाकर शृंगारे यांनी केंद्र शासनाच्या विविध कामाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीस संजय दोरवे यांनी केले तर शेवटी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी आभार मानले. या मेळाव्यास लातूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाडी आणि मोर्चाचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




