*मसलगा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आधार ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न*..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
निलंगा तालुक्यातील मसलगा येथे 31 डिसेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने आधार ग्रुप मसलगा च्या वतीने व संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्यातुन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आधार ग्रुप च्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळात उदभवलेला रक्ताचा तुटवडा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल आधार ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांचा औसेकर महाराजानी सत्कार केला. व रक्तदात्या युवकांना महाराजांच्या हस्ते प्रमाणपत्राच वितरण करण्यात आल.
यावेळी गावातील पोलीस पाटील संतोष नरहारे, व्हा. चेअरमन विलासराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहनराव पिंड, माजी मुख्याध्यापक भागवत पिंड, राजन साळुंके, विठ्ठल जाधव, सतीष जाधव, बिभीषण लव्हरे, बापुराव जाधव, प्रशांत लव्हरे, सुरेंद्र जाधव, पंडित लव्हरे, माधव मोहिते, पत्रकार माधव शिंदे, पत्रकार रमेश शिंदे, पत्रकार रविकिरण सुर्यवंशी तसेच आधार ग्रुप चे हारिदास साळुंके, आशीष पाटील, सतीष पिंड, अखिल सय्यद, तन्मय कुलकर्णी, राहुल आरेराव, पृथ्वीराज पाटील, सुदर्शन पतंगे, अमर जाधव, आदित्य पाटील, ऋषी पाटील, अनिल तोरखडे, ज्ञानेश्वर तेलंगे, अजित पिंड, माधव पिंड, माधव म्हेत्रे, तौसीब सय्यद, अजय म्हेत्रे, नरसिंग लव्हरे आदीसह गावातील युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.











