रविवारी डॅाक्टर जानाईश्री-पुरस्कार वितरण सोहळा.
लातूर;ता.१०जुन:
> डाॅ.सचिन बालकुंदे यांनी कोरोना काळात केलेल्या निस्वार्थ रूग्णसेवे बद्दल त्यांची डाॅक्टर डे दिवशी डाॅक्टर जानाईश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना रविवार दिनांक ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मित्र नगर येथील जानाई फंक्शन हाॅल येथे लातूर मधील प्रसिध्द जेष्ट डाॅक्टर डाॅ.अशोक अरदवाड यांच्या हस्ते डाॅक्टर जानाईश्री पुरस्काराने सपत्नीक सन्मानित केले जाणार आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळत हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
> या पुरस्काराचे स्वरूप आहे रू २५ हजाराचा धनादेश,शाल,श्रीफळ, पुष्पहार,सन्मान पत्र,सन्मान चिन्ह,
> डाॅ.सचिन बालकुंदे यांनी कोरोना काळात किल्लारी सारख्या ग्रामीण भागात रेमडीसिव्हर इंजक्शन, ऑक्सिजन यांचा वापर नकरता आहे ते उपलब्ध वैद्यकिय औषधे व साहित्याचा वापर करत समुपदेशन, प्राणायम, योगा,सकस अहार चा योग्य समतोल साधत हजारो रूग्णांना कोरोना पासून जीवनदान दिले आहे.
> पुरस्कार कार्यक्रम एफ.बी.लाईव्ह केला जाणार आहे.आपण या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष्या डाॅ.सौ.वैशाली टेकाळे, कार्याध्यक्ष अभियंता श्रीकांत हिरेमठ, सचिव प्रा.दत्ता मुंढे,विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष समर्थ कुलकर्णी,सचिव प्रदुम्न कुलकर्णी , वैष्णवी दिवान,अनुष्का कुलकर्णी यांनी केले आहे.
> कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पालक अतुल ठोंबरे,संजय अयाचित, राजेश मित्तल,पंकज तेरकर,अर्कि.विजय सहदेव,सुनिल अयाचित,डाॅ.अभिजीत मुगळीकर,डाॅ.ऋजुता अयाचित, डाॅ.आरती संदीकर,डाॅ.माधवी निरगुडे. अर्थवर्धिनी जानाई पतसंस्थेच्या अध्यक्षा गीता ठोंबरे,संपदा दाते,श्री गुरूजी आयटीआय चे भूषण दाते,सुनिल बोकील प्रा.व्हि.के.गाडेकर हे विशेष प्रयत्न करत आहेत.