*रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या आर्थिक विकासासाठी रणनीती आखण्याची गरज*
*राज्यसभा सांसद कथा पूर्व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू*
*दयानंद विधी महाविद्यालयात आयोजीत आँनलाईन वेबीनार कार्यक्रम संपन्न*
लातूर दि.२३.
भारताने येणाऱ्या काळामध्ये इतर देशांशी सलोख्याचे संबंध राखताना आपल्या देशाचा विकास कसा साधता येईल याबद्दल विचारपूर्वक निती ठरवण्याची गरज आहे असे मत राज्यसभा सांसद कथा पूर्व केंद्रीय मंत्री माननीय श्री सुरेश प्रभू यांनी, ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत: सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावरच्या ऑनलाइन वेबिनार मध्ये प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.आझादीच्या अमृत महोत्सवी आणि दयानंद विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विधी महाविद्यालयाने या वेबिनारचे आयोजन केले त्यावेळी ते बोलत होते
या विषयावर बोलताना प्रभू म्हणाले की भारताच्या रशिया, अमेरिका, चीन व इतर देशांची असलेल्या राजकीय संबंधाचा आढावा घेतला. तसेच रशिया-युक्रेन युद्धानंतर आगामी तेल संकट, भविष्यात जलद आर्थिक विकास साधण्यासाठी परकीय गुंतवणूक, आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य आणि इतर राष्ट्रांकडून आवश्यक सहकार्य अबाधित ठेवण्यासाठी भारताने धोरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या राजकीय परिस्थितीवर आणि आगामी काळात भारतासमोरील आव्हानांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारताच्या विकासात तरुणांचे योगदानही अधोरेखित केले
अध्यक्षीय भाषणात दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमण लाहोटी यांनी संस्थेचे विद्यार्थी समाजाची सेवा करण्यामध्ये अग्रेसर असतात तसेच कायद्याची जनजागृती मध्येही तत्पर असतात असे नमूद केले तसेच अशा प्रकारच्या विधायक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी दयानंद शिक्षण संस्था सदैव पुढाकार घेईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्री रमेश बियाणी, सदस्य ॲड श्रीकांत उटगे तसेच ॲड. श्री आशिष बाजपाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दयानंद शिक्षण संस्थेच्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व इतर कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी समन्वयक श्री धनंजय सूर्यवंशी यांनी, प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शुभांगी पांचाळ यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. पुनम नाथानी यांनी केले.