नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक संजय जोशी यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने हा छोटासा लेख
स्वतः ची वेगळी अशी प्रतिभा शैली जपणारा ,स्वराशी लाघवी लीलया क्रीडा करण्यात निपुण असलेला नादेडला भूषण वाटणारा , मराठवाड्याची शान संजय जोशी आहे. मैफिलीला ताब्यात घेण्याची हुकुमत ठेवणारा खणखणीत ,खड्या आवाजाचा गायक म्हणून सुपरिचित आहे ,त्यांनी गीत रामायणातील गाणी गाऊन एक आपला आगळा वेगळा आयाम तयार केला आहे. स्वतःची वेगळी शैली ,आवाजा मधील मधुर कडकपणा , हि वैशिष्ट गायकजोशीची गायकी सांगते. आकाशवाणी वरील सुगम संगीताचा मान्यता प्राप्त गायक म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली आहे.
एरवी त्यांच्या कडे सहज पाहिले तर एक लाजरा बुजरा आणि अति संकोचशिल व्यक्ती पण एकदा का मैफिलीमध्ये शिरल्या नंतर स्वरांनाहि लाजवायला लावतात इतकी क्षमता त्यांच्यात आहे.प्रकाश सेनगावकर आणि संजय जोशीनी ‘ तुमची करमणूक आमची हौस ,हा प्रांजळपणे सुरु केलेली मैफल याचे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत.
जोशीची गाणी नांदेड करांनी ऐकली आहेत. काही अन्य गायकाच्या आवाजात तर काही स्वतः च्या आवाजात त्यांनी आपल्या बहरायच्या,फुलायच्या दिवसापासून ते आजपर्यंतच्या काळात आपली अनोखी मैफिल सादर करीत आले आहेत .माणसाचा असलेला बुजरा स्वभाव किवा अन्य अशा कारणांमुळे व्यावसाईक पातळीवर महाराष्ट्रात त्याच्या मैफलीचे प्रयोग कमी पडले,तसेच एक उमदा ,गोड गळ्याचा गायक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली नाही असे सारखे जाणवते .हे हि तितकेच खरे आहे.
मराठवाडा विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या युवक महोत्सवात सतत तीन वर्ष प्रथम पारितोषिक , सुवर्णपदक हैट्रिक करणारे संजय जोशी हे मुळचे नांदेड चे त्यांनी एम कॉम ,डी बि एम पर्यंत शिक्षण घेऊन , ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नौकरी करीत आपल्या गाण्याच्या आवडीला सवड देण्याचे त्यांनी ठरविलेले होते.सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपली साधना सुरूच ठेवली आहे. गायनाचे प्राथमिक शिक्षण त्यांनी पंडित नाथराव नेरळकर यांच्या कडे घेतलेले आहे. त्यानंतर डॉ अण्णा साहेब गुंजकर यांच्या कडे उपांत्य पर्यंत चे शिक्षण घेतले आहे. त्यांना आजपावेतो अनेक मान सन्मानांनी गौरविण्यात आलेले आहे. महाकवी कालिदास ,संगीत स्पर्धेत राज्य पुरस्कार ,दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्र तर्फे घेण्यात आलेल्या युवक संगीत समारोहात पुरस्कार ,भोपाळ सहित जबलपूर ,इंदोर ,अहमदाबाद ,पुणे,हैदराबाद ,येथे स्वतंत्र मैफिलीचे का र्यक्रम झाले आहेत, प्रकाश सेनगावकर सोबत आजवर ३००० हजारहून अधिक गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.त्याच्या साथ संगतीला तबलावादकजगदीशदेशमुख,डॉ.प्रमोददेशपांडे,स्वरेश,स्वरूप,गोविंद पुराणिक,पंकज शिरभाते आदीची,साथ कामी आलेली आहे .महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रा बाहेर त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत.केवळ त्यांनी गायनाचेच अंग बाळगले नाही तर इतर कार्यक्रमात त्यांनी १९९३ साली राज्य पातळीवर त्यांनी संगीत नाट्य स्पर्धेत सांगलीला कट्यार काळजात घुसली ;या नाटकातील सदाशिव च्या भूमिकेबद्दल रा.ब मारुती तुकाराम कामटे हा गायनासाठी चा खास पुरस्कार ,व रोप्य पदक त्यांनी पटकावले होते.१९९३ चा स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार त्यांनी मिळविला ,मराठी भावगीते , सुगम गायन, भक्ती गीते , भावगीते , या सगळ्या संगीतातला हातखंडा असलेले जोशी ,यांच्या आवाजातील गोडवा, माधुर्य ,इतकाच त्यांचा खणखणीत आवाज मनाला भावतो. आवाजातील फिरक, आरोह अवरोह ,तसेच चढ,उतार ,त्यांना स्वराची असलेली जाण,सहजतेने रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. म्हणून त्यांच्या संगीत वाटचालीची दखल संगीत विश्वाला घ्यावी लागेल.भक्ती ,तसेच सुगम गायकांच्या अलीकडील काळातील गायका मध्ये नांदेड च्या या हरहुन्नरी गायकाचे स्थान बऱ्याच वरच्या क्रमाकावर आहे.मराठवाड्यातला गायन हिरा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.बाबूजी सुधीर फडके यांच्या आवाजातील माधुर्याशी साधर्म्य पावणारा संजय जोशीचा आवाज रसिक वर्गाच्या मनात रुंजी घालणारा आहे.ज्यांच्या गीत रामायण गायनाने ब्रह्मानंद टाळी लागते असे नादेड भूषण गायक संजय जोशी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

लेखन:
प्रा. महेश कुडलीकर ,
५३, शांतीनगर देगलूर