24.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeठळक बातम्यारस्ते, नाल्याचा शुभारंभ

रस्ते, नाल्याचा शुभारंभ

*ना. अमित विलासराव देशमुख यांच्या नियोजनाने लातूर मतदारसंघ* 

*सर्वांगिण विकासाच अनुकरणीय मॉडेल तयार होईल*

*लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या *हस्ते लातूर शहराशी जोडणाऱे रस्ते तसेच बदीस्त नाल्याच्या कामांचा शुभारंभ*

लातूर  (प्रतिनिधी ) : दि. १६

  विविध विकास योजना एकत्रितपणे कल्पकतेने राबवून लातूर शहर विधानसभा        मतदासंघाचा सर्वांगिण विकास साधण्याचे नियोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आखले असून त्यावर आता अंमलबजावनी सूरू झाली आहे. यातून एक अनुकरणीय विकासाचे मॉडेल तयार होईल असे प्रतिपादन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केले आहे.

 लातूर शहर मतदारसंघातील विविध गावांना लातूर शहराशी जोडणाऱे रस्ते तसेच बदीस्त नाल्याच्या कामांचा शुभारंभ विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत  बुधवार दि. १६  मार्च २०२२ रोजी करण्यात आला. या प्रसंगी ॲड. किरण जाधव बोलत होते. या कार्यक्रमास शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, टवेन्टिवन शुगर लि.चे व्हा.चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख,बाभळगावच्या सरपंच प्रिया मस्के उपसरपंच गोविंद देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके आणि जि. प.सदस्य पंडित ढमाले सौ  सोनाली रमेश थोरमोटे, सौ. साधना सुभाष जाधव, पंचायत समितीच्या सभापती सौ सरस्वती पाटील, उपसभापती  प्रकाश उफाडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, कार्यकारी अभियंता एस.जी.गंगथडे पंचायत समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. 

 यावेळी पूढे बोलतांना लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की, मागची दोन वर्षे कोरोना प्रादूर्भावामूळे राज्यातील आणि देशातील विकास प्रक्रीया मंदावली होती. मात्र हे सावट दूर झाल्याने आता विकासकामांना गती देण्यात येत आहे. या प्रक्रीयेचाच भाग म्हणून लातूर शहरानजीकच्या गावातून विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. लातूर शहराचा विकासाचा अदययावत अराखडा पालकमंत्री ना. देशमुख यांनी तयार केला असून शहरानजीकच्या गावाचांही या अराखडयात समावेश आहे. नजीकच्या गावाचा विकास झाला तरच शहरातील सुधारण उठून दिसणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन्‍ या नियोजन अराखडयावर अमंलबजावनी करतांना प्रथमता गावात राबवणाऱ्या योजनांना प्राधान्य दिले आहे असे त्यांनली म्हटले आहे. 

*खाडगाव येथे खाडगाव ते  रिंग रोड कामाचा शुभारंभ*

  खाडगाव येथे खाडगाव ते  रिंग रोड कामाचा शुभारंभ प्रसंगी जीप सदस्य सोनाली थोरमोटे, खाडगावच्या उपसरपंच सपना पाटील, प्रवीण सूर्यवंशी, योगेश पाटील, आयुब मुजावर, हनमंतराव देशमुख, ग्रामसेवक गोमसाळे, दादा मस्के, आनंद देशमुख  आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसयुआयचे जिल्हा अध्यक्ष शरद देशमुख यांनी केले.

*वासनगाव ते राज्य मार्ग २४३ रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ*

  वासनगाव येथे वासनगाव ते राज्य मार्ग २४३ रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. वासनगाव येथील कार्यक्रमास प्रवीण सूर्यवंशी, राजेंद्र कोळगे, अतुल ठोंबरे, भागवत साळुंके, पंडित आलुरे, नरसिंग निकामे, सिद्धेश्वर खरे, विश्वनाथ बोयणे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. 

*गंगापूर ते पाखरसांगवी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ*

  लातूर तालुक्यातील गंगापूर येथील गंगापूर ते पाखरसांगवी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, शाखा अभियंता पी एस भवाळ, पंचायत समिती सदस्य रामराजे चामे, प्रताप पाटील, तानाजी फुटाणे, रमेश थोरमोटे, गंगापूर येथील प्रवीण सूर्यवंशी, राजकुमार सूर्यवंशी, डॉ.सतीश कानडे, जानुमीया शेख, रमेश गाडेकर, गुणवंत वाघे, किरण शिंदे, बालाजी भुसे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

*कातपूर ते लातूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ*

  लातूर शहर मतदारसंघातील विविध गावांना लातूर शहराशी जोडणाऱ्या जवळपास २ कोटी ७५ लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाअंतर्गत कातपूर ते लातूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जि. प.सदस्य सुभाष जाधव, लालासाहेब देशमुख, कातपूरच्या सरपंच रेणुका एतबोइने, उपसरपंच विष्णू देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, राजाभाऊ गलांडे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, बालाजी झीपरे, विष्णुदास धायगुडे, बाळकृष्ण देशमुख, आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कातपूर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव मस्के यांनी केले तर शेवटी आभार राहुल देशमुख यांनी मानले.

*बाभळगाव ते राज्यमार्ग २३५ या रस्त्याच्या* 

*मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ*

  बाभळगाव ते राज्यमार्ग २३५ या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ प्रसंगी बाभळगावच्या सरपंच प्रिया मस्के उपसरपंच गोविंद देशमुख ग्रामसेवक अनंत मडके युवराज जाधव जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.जी.गंगथडे शाखा अभियंता व्ही बी बिराजदार उपअभियंता जयंत जाधव प्रवीण सूर्यवंशी जीवनराव देशमुख,सचिन मस्के, युवराज थडकर गोपाळ थडकर, अशोक नाडागुडे शिवलिंग थडकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते बाभळगाव ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहदेव मस्के यांनी केले तर शेवटी आभार बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख यांनी मानले.

——–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]