निलंगा शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यासाठी माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड यांच्या आमदार फंडातून ५० लाख रूपयांचा निधी…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष तथा आ. रमेश कराड यांच्या आमदार फंडातून निलंगा शहारातील अंतर्गत डांबरी रस्ते व दुरूस्तीसाठी ५० लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
निलंगा शहरातील रस्त्यासाठी नगरपालिकेने महाविकास आघाडी मधील मंञ्याना व पालकमंञी अमित देशमुख यांना रस्ते विकासासाठी निधीची मागणी केली परंतु गेल्या दोन वर्षात या राज्य सरकारने फुटकी कवडीही निधी दिला नाही.केंद्रिय मंञी नितीन गडकरी यांना माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी पाठपुरावा करून निलंगा शहरातील मुख्य रस्ते करण्यासाठी ७२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून शासकीय स्तरावर संबंधित निधीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.लवकरच त्याही कामाला गती येणार आहे.
आ. निलंगेकर पालकमंञी असताना शंभर कोटी रूपये निधीचे पाणीपुरवठ्याचे मोठे काम झाले असून पाईप लाईनसाठी खोदकाम झाल्यामुळे संपूर्ण रस्ते उखडून गेले आहेत,त्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणीतून मार्ग काढून जावे लागत आहे.याची दखल घेत आ. निलंगेकर आणि आ. रमेश कराड यांच्या निधीतून निलंगा शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी एकूण ५० लाखा निधी देण्यात आहे.आ.निलंगेकर यांचा शब्द पाळत तात्काळ शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी २० लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून तात्काळ शहरातील मुख्य रस्ते डांबरीकरण होणार असून लवकरच या कामाला गती येणार आहे.अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
शहरातील लातूर बिदर रस्ता,शिवाजी नगर,आडत लाईन,बँक काॕलनी,शिवाजी विद्यालय समोरील रस्ता,बस्वेश्वर नगर, पांचाळ काॕलनी,भूमि अभिलेख कार्यालय व दादापीर दरगा,पंचायत समिती कार्यालय ते दत्त नगर जाणारा मुख्य रस्ता पूर्ण पश्चिम तसेच झेराॕक्स लाईन,पांचाळ ते डी.पी.रोड पूर्ण पश्चिम रस्ता व ईनामवाडी येथे पाण्याची टाकी व जि.प.शाळेपर्यंत जाणारा मुख्य रस्ता डांबरीकरण करून दुरूस्ती करण्यात येणार आहे.
———————————————————————
खासदार सुधाकर शृंगारे यांच्या निधीतून ४० लाख रूपयाचा निधी नगर पालिकेच्या अंतर्गत रस्त्यासाठी देण्यात आला असून विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या फंडातून १५ लाख निधी देण्यात आला आहे त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्याची सुधारणा होऊन चकाकी येणार आहे.
———————————————————————