राज्यमंत्री संजय बनसोडे यांची बातमी

0
270

श्रीगुरुजी आयटीआयचा नावलौकिक वाढावा
राज्यमंत्री बनसोड यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

लातूर – दि. २० (प्रतिनिधी )- लातूर नगरी ही शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखली जाते. शिक्षणाचा ‘ लातूर पॅटर्न’ देशभर गाजला त्याचप्रमाणे आयटीआय क्षेत्रातही श्रीगुरुजी आयटीआयचा नावलौकिक देशभर वाढावा यासाठी संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत ,.अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण , पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
श्री जानाई अभियांत्रिकी प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वासनगाव आवारात प्रवेश माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते . त्यांच्या हस्ते संस्थेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचकावर संस्थाध्यक्ष अतुल ठोंबरे, प्राचार्य व्ही.के .गाडेकर , राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय बनसोडे म्हणाले की., ‘ लातूर पॅटर्न ‘ ला शोभेल अशी ही पुस्तिका आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी श्रीगुरुजी आयटीआयने काम करावे . संस्थाचालकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यास शासनाच्या वतीने व वैयक्तिकरित्या आपण लागेल ती मदत देण्यास कटिबद्ध आहोत , असा शब्द मी देतो असे सांगत त्यांनी संस्थेची उदगीरला एक शाखा काढा त्यासाठी लागेल ते सहकार्य करेल , अशी अपेक्षाही व्यक्त केली .

प्राचार्य गाडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रीगुरुजी संस्थेची माहिती दिली. या आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन , वायरमन, वेल्डर, फिटर , सेक्रेटीयल प्रॅक्टिस , फिजिओथेरपी टेक्निशियन आदी अभ्यासक्रम आहेत .ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. अशी नाविन्यपूर्ण माहिती पुस्तिका महाराष्ट्रात प्रथमच श्रीगुरुजी आयटीआय प्रकाशित केली आहे , याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले . संस्थाध्यक्ष अतुल ठोंबरे यांनी संस्था स्थापनेमागचा हेतू सांगितला. वाढदिवसानिमित्त ठोंबरे यांचा राज्यमंत्री बनसोडे यांनी सत्कार केला. पंढरीनाथ देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . या कार्यक्रमाचे थेट प्रसारण फेसबुक लाइव्ह वरून करण्यात आले होते . कार्यकारी मंडळाचे सदस्य सुधाकर जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कार्यकारी मंडळाचे सचिव संजय प्र. अयाचित, सदस्य सुनील बोकील, रवी मार्कंडेय , संतोष कुलकर्णी, बाळासाहेब चाकूरकर तसेच नरेंद्र पाटील , बाळासाहेब जाधव, विशाल विहारे , जानाई प्रतिष्ठानचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार गोपाळ कुळकर्णी , निशिकांत अंधोरीकर आदींची यावेळीउपस्थिती होती.

बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here