23.6 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeउद्योग*राज्यात लातूर जिल्हा बँक प्रेरक संस्था*

*राज्यात लातूर जिल्हा बँक प्रेरक संस्था*

मराठवाडा विदर्भ राज्यात अव्वल स्थानी लातूर बँक

राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे प्रतिपादन

लातूर दि. १७.

राज्यात मराठवाडा विदर्भात असलेल्या जिल्हा बँकात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही टॉप टेन असलेली प्रेरक संस्था असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्था अतिशय काटेकोर अंमलबजावणी करीत नावलौकिक मिळवला असून लातूर जिल्हा बँकेच्या प्रगतीबद्दल राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी कौतुक करत शेतीचे अर्थशास्त्र बदलण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकानी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त तथा सहकार निंबंधक अनिल कवडे यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते १७ जुलै रविवारी लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टिळक नगर मुख्यालयात भेट दिली त्यानंतर त्यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

पुढे बोलताना आयुक्त कवडे म्हणाले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकरी सभासद याना आर्थिक मदत केली आहे हे करीत असताना बँकेची वसूली परिस्थती चांगली राहिलेली आहे याचे कारण पारदर्शकता ठेवून ग्राहकांना जलदगतीने सेवा देत असताना पुढील आव्हाने याकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे सांगून नविन कर्ज, ठेवी, डीपॉझिट, सायबर सुरक्षा याकडेही त्यांनी लक्ष वेधत व्यवसाय वाढीसाठी बँकेने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी भेट दिली त्यावेळी अप्पर निम्ब्धक शैलेश कोतमिरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक अँड श्रीपतराव काकडे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक अशोक गोविंदपुरकर,अनुप शेळके राजकुमार पाटील संचालिका सौ सपना किसवे सौ अनिता केंद्रे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, विविध खाते प्रमूख अधिकारी उपस्थित होते

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर निबंधक तथा सोलापूर जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, विभागीय सहनिंबधक नाईकवाडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपुरकर अँड राजकुमार पाटील, अनूप शेळके, संचालिका सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, विशेष लेखा परीक्षक यू व्ही पवार उपस्थित होते

लातूर जिल्हा बँकेचा आदर्श इतर बँकांनी घ्यावा
अप्पर निबंध शैलेश कोतमिरे यांचे आवाहन

यावेळी बोलताना कोतमिरे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वेगवेगळ्या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकरी सभासद याना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रगतीकडे घेवून नेण्याचे काम केले आहे हे करित असताना संस्था नफ्यात ठेवली आहे राज्याला दिशा देण्याचे काम लातूर बँकेने करून वेगळा ठसा उमटविला आहे असे सांगून इतर बँकानी हा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी जिल्हा बँकेच्या कार्याची माहिती दिली वेगवेगळ्या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकरी सभासद याना आर्थिक मदत, निराधार योजना घरपोच सेवा, महीला बचत गट, पतसंस्था कर्ज, ठेवी, पिक कर्ज, याबाबत माहिती दिली बँकेच्या वतीने बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांच्या हस्ते सहकार आयुक्त अनिल कवडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर अप्पर निंबधक शैलेश कोत मिरे यांचा सत्कार बँकेचे जेष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

यावेळी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक सी एन उगीले, तानाजी जाधव, उपसरव्यवस्थापक बि. व्ही. पवार, वसूली व्यवस्थापक व्ही जी शिंदे, आय टी प्रमुख शरद मुळे, बँकेचे मिडिया समन्वयक हारिराम कुलकर्णी तसेच विविध खात्यांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन बँकिंग ऑफिसर सुनील पाटील यांनी करत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कार्य सुरू असून बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय संचालक मंडळाने बँकेने विविध चांगल्या योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]