केळगाव येथे मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामभाऊ मेकले यांचा सत्कार
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील केळगाव येथील श्रीधरराव शिवणे सार्वजनिक ग्रंथालयाच्या द्विशतकपूर्तीनिमित्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे बोलताना म्हणाले, विद्यार्थी हा देशाचा कणा आहे त्यांनी आपल्या गावातील ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तकाचा भरमसाठ साठा असतो त्याचा फायदा घेऊन उद्याच्या जीवनातील भवितव्यासाठी ज्ञानार्जनाच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या पदावर जाऊन नाव कमावू शकता असेही विद्यार्थ्यांच्या समोर मनोगतात व्यक्त केले.

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील श्रीधरराव शिवणे सार्वजनिक वाचनालयाच्या प्रसंगी मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामभाऊ मेकले यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालयाच्या अडी-अडचणीवर भाष्य करित असताना ग्रंथालयाचे वेळेवर अनुदान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.तसेच,जिल्हा परिषदेकडून ग्रंथालयास फर्निचर व पुस्तके शेष फंडातून प्राप्त करून दयावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.ग्रंथालयातील पुस्तकामुळे आजचा विद्यार्थी घडत असतो तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रंथ देवाण-घेवाणीच्या माध्यमातून याचा फायदा करून घेणे गरजेचे असल्याचे यावेळेस नमुद केले.
द्विशतकपूर्तीच्या प्रारंभी ग्रंथालयाचे जनक एस.आर.रंगनाथन व सरस्वतीच्या प्रतिमेचे प्रमुखांच्या हस्ते दिपप्रज्वलन व पुष्पांजली अर्पित करण्यात आले.तर,दगडू सोळुंके,अजित माने,हरिभाऊ काळे,नं.चिचोंडीकर याचे मनोगत झाले.या कार्यक्रमाचे सुञसचलन प्रा.बाबासाहेब लोंढे तर आभार प्रा.प्रदिप मुरमे यांनी मानले.
निलंगा तालुक्यातील केळगाव येथील श्रीधरराव शिवणे सार्वजनिक वाचनालयाच्या द्विशतकपूर्ती कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतिनिधी म्हणून दगडू सोळुंके व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे यांची उपस्थिती होती.सत्कारमुर्तीत मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामभाऊ मेकले,निवृत्त कर्मचारी,वित्त विभाग,जि.प.लातूर नं.अं.चिचोंडीकर तर विशेष उपस्थिती माजी सभापती पंचायत समिती अजित माने,पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर युवराज जाधव,कार्यवाहक प्रभाकर कापसे,सहकार्यवाहक स्वामी गुप्तलिंग,सदस्य अनिल पाटील,संजय सुर्यवंशी,सेवानिवृत्त उपअभियंता नानासाहेब बिरादार,सरपंच,उपसरपंच कांबळे सुधाकर चव्हाण,भारतीय सांस्कृति पोषक संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मिटकरी,निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रल्हाद अट्टरगेकर,सचिव पी.पी.अट्टरगेकर,प्राचार्य एस.एम.मिटकरी,सुलोचनाबाई कुलकर्णी,सचिव प्रशांत कुलकर्णी,सदस्य वैभव पाटील,महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयाच्या भिसे मंजुषा,जोशी,यशोदीप सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.काळे, ग्रंथपाल प्रशांत साळुंके,प्रमोद कुलकर्णी,ग्रंथपाल शिवराज स्वामी आदींची उपस्थिती होती.
श्रीधरराव शिवणे सार्वजनिक वाचनालय यांच्या द्विशतकपूर्तीनिमित्ताने संयोजकांच्या वतीने जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे,दगडू सोळुंके,रामभाऊ मेकले,सुनिल गजभारे,प्रभाकर कापसे,नं.चिंचोडीकर,अजित माने,हरिभाऊ काळे,स्वामी गुप्तलिंग,भिसे मंजुषा,जोशी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करित हा कार्यक्रम संपन्न झाला.


