* राम मेकले यांचा सत्कार*

0
246

ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाचनसेवा द्यावी- सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे 

मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले यांचा सत्कार..

लातूर,- (प्रतिनिधी) बदलत्या काळानुसार सार्वजनिक ग्रंथालयांनी वाचनकांना ग्रंथालयाकडे आकृष्ट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून, पारंपारिक सेवेसोबतच आपल्या परिसरातील वाचकांना एखाद्या वॉट्सअप गुृपमधून पुस्तकांची सूची,नवीन ग्रंथ ,विविध कार्यक्रम,नोकर भरतीविषयक माहिती दिल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी येथे केले.
जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्यावतीने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन/वाचन प्रेरणादिन, जिल्हास्तरीय ग्रंथालय कार्यशाळा आणि मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी राम मेकले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवार,दि.१५ ऑक्टोबर २०२१ रोजी हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आला.त्यावेळी ग्रंथालयाबाबत शासनाचे धोरण व त्यावर उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करताना हुसे बोलत होते.अध्यक्षपदी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगी बेरकीळे होते.उद्घाटक विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधनचे विश्‍वस्त डॉ.ब्रिजमोहन झंवर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, ग्रंथालय निरीक्षक सोपानराव मुंढे, सहाय्यक ग्रंथायल संचालक कार्यालय अधीक्षक अनिल बावीसकर, व डॉ.आरती झंवर यांची उपस्थिती होती.
आरंभी डॉ.कलाम व अॅड.त्र्यंबकदास झंवर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मराठवाडा ग्रंथालय संघ अध्यक्ष राम मेकले व राजकन्या मेेकले यांचा शाल,पुष्पहार,ग्रंथभेट व फेटा बांधन सत्कार करण्यात आला.

यावेळी वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने विभागीय ग्रंथपाल सुभाष मुंढे यांनी मार्गदर्शन केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे यांनी ग्रंथालय प्रोफाईल संदर्भात माहिती दिली.अध्यक्षीय समारोप हावगी बेरकीळेे यंानी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर कापसे यांनी केले.अनिल पाटील यांनीही मनोगत मांडले.सूत्रसंचालन जहॉंगीर सय्यद यांनी केले.तर शादुल शेख यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय संघाचे एल.बी.आवाळे, काशिनाथ बोडके,किरण बाबळसूरे, युवराज जाधव,विठ्ठल कटके, अशोक खोडवे, राम मोतीपवळे, गुप्तलिंग स्वामी,गोकर्णा जाधव, सुनंदा मिरगाळे,तसेच संतोष करमले,कुमार भालेराव,सुशील मेकले,एस.आर.काळे,ग्रंथपाल प्रशांत साळुंके,शिवराज स्वामी आदिंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here