*राष्ट्रवादीचा मोर्चा*

0
264
*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा महानगरपालिकेवर नागरिकांच्या विविध मागणीसाठी धडक मोर्चा*


लातूर शहरातील नागरिकांच्या मुलभूत प्रश्नावर लातूर शहर महानगरपालिका निष्क्रिय ठरली आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे.
लातूर शहरातील पाणी प्रश्नावर महानगरपालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडालेला असून कधी दहा तर कधी आठवड्यातून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे.तो सुरळीत करुन पाणीपुरवठा आठवड्यातून दोन वेळा करण्याची यंत्रणा उभी करावी.लातूर शहरात जागोजागी कच-याचे ढिग दिसून येत असून लातूर शहराला जोडणा-या सर्वच रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे.यापासून दुर्गंधी पसरत आहे. तो त्वरीत उचलून लातूर स्वच्छता करावे.लातूर शहरातील विशेषतः गाव भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी व आदम नगर परिसरातील नागरिकांची रस्त्यांची मागणी पूर्ण करावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक पार्कचे सुशोभीकरण करावे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा त्वरीत बसविण्यात यावा.
लातूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत.ते ताबडतोब सुरू करण्यात यावे.नाना नानी पार्क सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्ले करावे व आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क ताबडतोब रद्द करावे.या मागण्या सात दिवसांच्या आत पुर्ण कराव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर शहरच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा,श्री.मकरंदजी सावे व शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय शेटे,अख्तर मिस्त्री,मुफ्ती फयाजअली,राजा मणियार,नामदेव बाप्पा, जाधव,गजानन खमीतकर,सय्यद इब्राहिम,रेखा ताई कदम,बाबा कांबळे,समीर शेख,निशांत वाघमारे,नवनाथ आल्टे,मनीषा ताई कोकणे,मधुताई शिंदे,विशाल विहिरे,पूजा गोरे,स्नेहा मोटे,साक्षी कांबळे,टिल्लू शेख,जहांगीर शेख, मुन्ना तळेकर, इर्शाद सय्यद, फारुक ताबोळी,फिरोज भाई,रामभाऊ रायेवार,अभिजित पांडे,बरकत शेख,अकबर शेख,इरफान शेख, इरफान बागवान, करुणा शिंदे,अरुणा शिंदे,सोहम गायकवाड,अभिजीत सगरे,जितेंद्र गायकवाड,रामभाऊ रायेवार,एहरार हक्कानी,हणमंत रजपूत,आदर्श उपाध्ये, राहुल बनसोडे,डी.उमाकांत,मुन्ना खान,अनिल वेरेकर,बस्वेश्वर रेकुळगे,कबीर शेख,खमर काजी,तोसिफ शेख,राम व्यवहारे, बाळासाहेब पोटभरे,पृथ्वीराज कापसे,अविनाश कांबळे,आशीष बोपणीकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here