लातूर/प्रतिनिधी ः- लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील रहिवाशी असणारे शिदवत्त शंकर भारती यांनी 35 वर्षात पोलीस सेवेत कर्तव्य पार पाडल्यानंतर हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाड्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केलेले आहे. या कार्याची दखल घेत कोल्हापूर येथे राष्ट्रीय शाहू प्रेरणा पुरस्काराने शिवदत्त भारती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाड्याचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत असणारे लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील शिवदत्त भारती यांनी पोलीस सेवेतही कर्तव्य बजावलेले आहे. 35 वर्ष पोलीस सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर त्यांनी विविध माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. या कार्याला व्यासपिठ उपलब्ध व्हावे याकरीताच त्यांनी हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाड्याची जबाबदारी स्विकारली. शिवदत्त भारती यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून ते कार्य यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहे. शिवदत्त भारती यांच्या या कार्यातून अनेक सामाजिक प्रश्नांचा उलगडा होऊन ते प्रश्न सुटण्यासाठी मदत झाली आहे. शिवदत्त भारती यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत कोल्हापूर येथे राष्ट्रीय शाहू प्रेरणा पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार राजमाता जिजाऊ समिती कागलच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता समरजितसिंह घाडगे, माजी मंत्री आ. विनय कोरे व राज्य नियोजन मंडळचे अध्यक्ष आ. राजेश क्षिरसागर यांच्या उपस्थितीत शिवदत्त भारती यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य विश्ववकोष सदस्य तथा योग सद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सदर पुस्कार हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा, हिंदू रक्षा समिती भारत या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवदत्त भारती यांचे हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाड्याचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश पुरी यांच्यासह आखाड्याच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केलेले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढलेली असून आगामी काळातही सामाजिक कामात असाच सहभाग नोंदवून समाजबांधवाच्या ऋणात राहू अशी प्रतिक्रिया शिवदत्त भारती यांनी व्यक्त केली आहे.




