आ. अभिमन्यू पवार व क्रिएटिव्ह फाऊंडेशन चा उपक्रम ठरला पर्वणीचा..
औसा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भक्तीसंध्या या कार्यक्रमातून प्रख्यात शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांनी स्वरांना स्पर्श करीत आपल्या गायनातून उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.आपल्या अभंगाचा श्रीगणेशा “पंढरीचा वास चंद्रभागे स्नान “यां भक्ती अभंगानी केल्याने औसेकरांना अक्षरशा भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाल्याचा अनुभव मिळाला.

नववर्षाचे स्वागत भक्तीमय वातावरणात अनुभवण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने (दि.१) जानेवारी रोजी औसा येथील उटगे मैदानावर खास शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.प्रख्यात शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्या सुरेल गायकीने "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान", पंढरीपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा, व तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल या भक्तिगीतांने औसेकरांना दाद देण्यास भाग पाडले या भक्तीसंध्या चा शेवट करीत असताना राहूल देशपांडे यांनी लक्ष्मी वल्लभा, दिना नाथा पद्मनाभ व कानडा राजा पंढरीचा या गीताने उपस्थित श्रोत्यांना भूरळ पाडत मंत्रमुग्ध केले.आमदार अभिमन्यू पवार यांच्या नववर्षाची सुरवात भक्तीसंगीताच्या हर्षोल्हासात या करोनामुळे खंडित झालेल्या परंपरेला या वर्षापासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.या अगोदर हभप इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन नववर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आले होते. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळाला.यावेळी कार्यक्रमाला उदघाटक म्हणून पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप गुरुबाबा महाराज औसेकर व ह भ प श्री महंत राजगीर दत्तगिर महाराज उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर हभप दतात्रय पवार गुरुजी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव सुहास पाचपुते, अॅड परिक्षीत पवार, रविशंकर केंद्रे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने हभप दतात्रय पवार गुरुजी लिखित श्रीगुरू या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तर माझा औसा व्हिजन २०३१ या निबंध स्पर्धेचे प्रथम विजेते सदाशिव कांबळे, व्दितीय विशाल मोरे, तृतीय राजश्री घोडके यांना सन्मानित करण्यात आले.याचबरोबर लातूर जिल्ह्य़ाचे नावलौकिक करणारे किशोरी मुर्के (गायक), संतोष साळुंके (शिवशाहीर), साक्षी पावले (आंतरराष्ट्रीय खेळाडू), स्नेहा शिंदे (लावणी कलावंत ), माधुरी माकणीकर (मिसेस महाराष्ट्र क्वीन), मेघा पवार (टिपीकल इंडियन गर्ल), सृष्टी जगताप (नृत्य कलाकार), बालाजी सुळ (काॅमेडी कलाकार) यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुळ यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.