25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*"रीड लातूर"कडून बाल दिनानिमित्त"पुस्तकांनी घडवले आयुष्य" या विषयावर मार्गदर्शन संपन्न*

*”रीड लातूर”कडून बाल दिनानिमित्त”पुस्तकांनी घडवले आयुष्य” या विषयावर मार्गदर्शन संपन्न*

लातूर :-– 14 नोव्हेंबर बाल दिनाचे औचित्यसाधून “पुस्तकांनी घडवले आयुष्य” या विषयावर  पुस्तक चळवळीत काम करणारे श्री राहुल लोंढे (अभ्यासक) यांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन दयानंद विद्यालय बाभळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक   एस.एस.राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कटारे डी.एस,रीड लातूरचे समन्वयक राजू सी पाटील, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी गायकवाड, शाळेचे पर्यवेक्षक मोरे जी.एन., भारती बी.आर. आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मार्गदर्शक श्री.राहुल लोंढे म्हणाले की,पुस्तके आपल्या जीवनातील खरे मित्र असून पुस्तकांच्या वाचनामुळे विचारांच्या कक्षा रुंदावतात व कल्पनाशक्तीचा विकास मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तके ही वाचलीच पाहिजेत. शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देतात.त्याचप्रमाणे थोर महापुरुषांचे चरित्र ग्रंथ, कथा,कविता,प्रोत्साहन पर गोष्टींची पुस्तके विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उपयोगी ठरतात.सौ.दीपशिखाताई देशमुख व आमदार धिरज देशमुख यांनी रीड लातूर उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तो उपक्रम निश्चितच बालमनावर वाचनाचे चांगले संस्कार घडवणारा असल्याचे सांगून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत ही चळवळ अधिक जोमाने पुढे जाण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी प्र.प्राचार्य कटारे डी. एस.यांनी वाचनाची सवय ज्या व्यक्तीला असते त्याच्यातील आत्मविश्वास हा इतरांपेक्षा वेगळा असतो त्यामुळे दररोजच्या आपल्या सवयी  मध्ये वाचनाची सवय देखील समाविष्ट केली पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
आपल्या मनोगतात रीड लातूरचे समन्वयक राजू सी पाटील यांनी रीड लातूर उपक्रमाच्या वाटचालीचा आढावा देत असताना या उपक्रमास समाजातील प्रत्येक घटकाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून, उद्याचा चांगला नागरिक घडवण्यासाठी शिक्षक मंडळी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले व बाल दिनाच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी पुस्तकांचे नियमित वाचन करणारे काही विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक सर्वश्री सय्यद के.एफ.,सूर्यवंशी व्ही.ए., देशमुख एस. एम.,मुसांडे एस. एन. ,माने पी.व्ही.,चेवले पी. एम., बोडके जी.एम.,थडकर एस.ए., राऊत के.टी.,गजभार जी.बी., बोचरे एस.जी., माने ए.एन.,गुंठे एस.एस., आरेकर पी.एस.,राठोड बी.व्ही., तोडकर सी.बी.आदी शिक्षक मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तमकुटे डी.एन.व माडे ए.जी.यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]