निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ; जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.कोमलताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली रूग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील निटूर गटातील जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.कोमलताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाच्या संदर्भात रूग्ण कल्याण समितीच्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीनिवास मोरे यांनी आढावा सादर केला आहे.सदर आढावा संदर्भात वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीनिवास मोरे यांनी कोरोना कालावधीत संबंधिताकडून जनजागृृती करून केंद्राअंतर्गत येणार्या गावखेड्डयातही संबंधितांकडून प्रसार करून लसीकरणाचा उच्चांक गाठण्यास महत्त्वाचे काम केल्याने यावेळी त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील,निटूर वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीनिवास मोरे आणि डाॅ.प्रतिक्षा पवार यांनी आपल्या केंद्राचे नाव उज्ज्वल करण्याचा त्यांचा मानस असल्याने कोरोना कालावधीत त्यांची स्तुतीही करण्यात आल्याने एक कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून ‘त्या’ दोघांचे नाव आजमितीला चर्चेत आहेत.आपला सेवाभाव हाच आपला ध्यास असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीनिवास मोरे यांना ‘ रूग्णांसाठी आपण हेल्थ इज वेल्थ नुसार त्यांना सांगितले पाहिजे असेही प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.आपण आल्यापासून ओ.पी.डी.चे प्रमाण वाठले असल्याने आपण यापुठेही आरोग्य सेवाभाव म्हणून चांगले काम करत राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. त्यांना तेवठीचं साथ केंद्रातील कर्मचार्यांची असल्याने एक शिस्त लावण्यात आम्हाला यश आल्याचे सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील शुशोभिकरणासाठी मागील काळात झालेल्या खर्चाचा इतिवृृत्त डाॅ.मोरे यांनी जिल्हा परिषद सदस्या सौ.कोमलताई धुमाळ यांच्याकडे सादर केले असता त्यास त्यांनी अनुमती दर्शविली आहे.यावेळी कांही नविन संकल्पनेच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण प्रस्तावांना होकार मिळाला आहे.
याप्रसंगी,रूग्ण कल्याण समितीचे सदस्त तथा पञकार राजकुमार सोनी,संगांयोचे सदस्य सुरेंद्र धुमाळ,रमेश मोगरगे,डाॅक्टर आणि स्वच्छता विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वातावरण बद्दलाचे कारण केवल वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीनिवास मोरे आणि डाॅ.प्रतिक्षा पवार यांच्या योग्य नियोजनामुळे हे केंद्राअंतर्गत गावातील रूग्णसंख्या मोठ्याप्रमाणात आवक असते.म्हणून योग्य नियोजनामुळे या केंद्राचे शुशोभिकरण करण्यात आल्याने याठिकाणचे वातावरण आल्हादायक झाले आहे.रूग्णांसाठी सर्वसोयी असल्याने केंद्रातील सर्व कर्मचारी एकदिलाने काम करतात हे विशेषत्त्वाने पाहिले जाते म्हणून रूग्णांसाठी हेल्थ इज वेल्थ नुसार याठिकाणी काम करत असतात.
———————————————————————











