30.1 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeराजकीयरेणापूर नगर पंचायत विकास कामाच्‍या जोरावर पुन्‍हा भाजपाच्‍या ताब्‍यात येणार

रेणापूर नगर पंचायत विकास कामाच्‍या जोरावर पुन्‍हा भाजपाच्‍या ताब्‍यात येणार

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचे प्रतिपादन

लातूर दि.०९– गेल्‍या पाच वर्षात भाजपाच्‍या नेतृत्‍वाखालील रेणापूर नगर पंचायतीने कोटयावधीचा निधी आणून विकासाची अनेक दर्जेदार कामे केली. वैयक्तिक लाभाच्‍या योजनेचा अनेकांना लाभ मिळवून दिला. यासर्व कामाच्‍या जोरावर रेणापूर नगर पंचायत पुन्‍हा भाजपाच्‍या ताब्‍यात येणार यात शंका नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केली. 

रेणापूर नगर पंचायतीच्‍या पहिल्‍या निवडणूकीत आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपाची सत्‍ता येवून पाच वर्षे यशस्‍वीरित्‍या पुर्ण केले. पक्षाने काम करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल रेणापूर येथील भाजपाच्‍या नगरसेवकांनी गुरूवारी भाजपा नेते तथा जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचा सत्‍कार करून आभार व्‍यक्‍त केले. त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. कराड बोलत होते. याप्रसंगी रेणापूरच्‍या  नगराध्‍यक्षा सौ. आरती राठोड, उपनगराध्‍यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे, जिप सदस्‍य सुरेंद्र गोडभरले, जिल्‍हा उपाध्‍यक्ष हनुमंतबापू नागटिळक, सरपंच संघटनेचे तालुकाध्‍यक्ष शरद दरेकर यांची उपस्थिती होती.

रेणापूर शहरात गेल्‍या ३०-३५ वर्षात कधीच झाले नव्‍हते एवढी विकासाची कामे गेल्‍या पाच वर्षात अभिषेक आकनगिरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपाने नगर पंचायतीच्‍या माध्‍यमातून करून दाखविले असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, निवडणूकीत जनतेला दिलेली आश्‍वासने जवळपास पुर्ण केली असून अत्‍यंत समाधानकारक नगरसेवकांनी काम करून दाखवले आहे. मात्र पक्षाला गालबोट लागेल अशी कृती कोणत्‍याच नगरसेवकाकडून झाली नाही ही आनंदाची बाब असून दर्जेदार रस्‍ते, नाली, नियमीत पाणीपुरवठा, लाईट यासह घरकुल योजना, गॅस, निराधारांच्‍या पगारी आणि वैयक्तिक लाभाच्‍या योजनेच्‍या असंख्‍य गरजूंना लाभ मिळवून देण्‍यात आला. यासर्व झालेल्‍या कामाची प्रचार आणि प्रसिध्‍दी करावी असे बोलून दाखविले. 

सर्व सामान्‍य मतदार विकासाला मत देतात, विकासाच्‍या पाठीशी राहतात. त्‍यामुळे सर्व भाजपा नगरसेवकांनी मतदाराच्‍या घराघरात जावून त्‍यांच्‍याशी संपर्कात राहून केलेल्‍या कामाची माहिती द्यावी. मतदार भाजपाला साथ देतील यात शंका नाही. उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल. गेल्‍या निवडणूकीत भाजपाला काठावरचे बहूमत मिळाले होते मात्र येणाऱ्या निवडणूकीत १७ पैकी १७ जागा जिंकण्‍याचे उदीष्‍ठ ठेवून आजपासूनच न थकता न थांबता कामाला लागावे असेही आवाहन आ. रमेशअप्‍पा कराड यांनी यावेळी बोलताना केले. 

प्रारंभी सर्व नगरसेवकांना काम करण्‍याची संधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त करून रेणापूर नगर पंचायतीचे उपनगराध्‍यक्ष अभिषेक आकनगिरे म्‍हणाले की, आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या मार्गदर्शनाखाली राज्‍यातील नवीन नगरपंचायतीत सर्वाधिक चांगले काम रेणापूर नगर पंचायतीने केले.  जिल्‍हयात सर्वाधिक निधी मिळविण्‍यात आणि विकासाची कामे करण्‍यात आम्‍हा सर्वांना चांगले यश आले. येणा-या निवडणूकीत भाजपाचाच झेंडा नगरपंचायतीवर फडकवू अशी ग्‍वाही दिली. 

यावेळी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती दत्‍ता सरवदे, पाणी पुरवठा सभापती उज्‍वल कांबळे, महिला व बालकल्‍याण सभापती सुरेखा चव्‍हाण, माजी उपनगराध्‍यक्षा तथा नगरसेविका राबीया शेख, विजय चव्‍हाण, सौ. सुमनताई मोटेगावकर, सौ. गोजरबाई आवळे, सौ. जमुनाबाई राठोड, श्रीकृष्‍ण मोटेगावकर, प्रदिप राठोड, शेख शफी, चंद्रकांत कातळे, गणेश चव्‍हाण, लखन आवळे, रमेश चव्‍हाण, अंतराम चव्‍हाण, महादेव राठोड यांच्‍यासह अनेकांची उपस्थिती होती.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]