14.7 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeराजकीय*रेणापूर विकास कामासाठी पावणेतीन कोटीचा निधी*

*रेणापूर विकास कामासाठी पावणेतीन कोटीचा निधी*

आ. रमेशअप्‍पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर येथील सहा विकास कामासाठी पावणेतीन कोटीचा निधी मंजूर

            लातूर दि.२६– रेणापूर नगरपंचायत हद्दीतील सहा विविध विकास कामासाठी तब्बल २ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे सदरील निधी मंजूर करून दिल्याबद्दल आ. कराड यांचे रेणापूर येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

        जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजने अंतर्गत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नव बौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री मा. ना. गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी रेणापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामासाठी तब्बल २ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. सदरील मंजूर निधीच्या माध्यमातून नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कोटी ४१ लक्ष रुपयांच्या कामात प्रभाग क्रमांक ८ मध्ये २७ लक्ष रुपये खर्चाच्या काळे यांचे घर ते खंडोबा मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम, प्रभाग २ मध्ये  ६० लक्ष रुपये खर्चाचे लक्ष्मण आडे यांचे घर ते जि प शाळेपर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम, प्रभाग १० मध्ये ५४ लक्ष रुपये खर्चाच्या चांदणी चौक ते अफहान शेख यांचे घर ते महबूब यांचे घर ते राम जोगदंड यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे,; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी ३४ लक्ष ९९ हजार रुपये खर्चाच्या कामात प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४७ लक्ष २० हजार रुपये खर्चाचे बौद्ध समाज समशान भूमी करिता कंपाउंड वॉल बांधकाम करणे, प्रभाग ४ मध्ये ११ लक्ष ९८ हजार रुपये खर्चाच्या गुणवंत लांडगे यांचे घर ते भीमा दासू चक्रे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम करणे, प्रभाग ४ मध्ये ७५ लक्ष ८१ हजार रुपये खर्चाच्या नारायण गायकवाड यांचे घर ते अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर परिसर सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम करणे या कामांना मान्यता मिळाली आहे.

          रेणापूर नगरपंचायतीच्या अंतर्गत विविध विकास कामासाठी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी शासनाच्या नगर विकास विभागामार्फत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी मंजूर करून घेतल्याने शहरातील विविध प्रभागात सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम मोठ्या प्रमाणात झाली असून नवीन पाणीपुरवठा योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रेणा नदीवर घाट बांधणे, अग्निशामन वाहन, समाज मंदिर सभागृह आदि विविध विकास कामापैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामांना शासन दरबारी मान्यता मिळाली आहे एकूणच गेल्या पाच वर्षात विकासाचा मोठा डोंगर निर्माण झाला आहे.

        जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ७६ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांचे रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, भाजपाचे शहर अध्यक्ष दत्ता सरवदे, सांगायो समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे, नगरपंचायतीचे माजी सभापती विजय चव्हाण, उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, महेश गाडे, शेख अजीम, राजू आलापुरे, उत्तम चव्हाण, अंतराम चव्हाण, उत्तम घोडके, रमा चव्हाण, राजू आत्तार, गणेश चव्हाण, लखन आवळे, धम्मानंद घोडके, संतोष राठोड, शरद चक्रे, सचिन शिरसकर, दिलीप चव्हाण, विशाल कांबळे, अच्‍युत कातळे, योगेश राठोड, रफिक शिकलकर, हनुमंत भालेराव, गणेश माळेगावकर, कारभारी चव्‍हाण, पप्‍पू कुडके, रमेश वरवटे, सोपान सातपुते यांच्यासह भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्व स्थरातील नागरिकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]