लातूर : रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने डिस्ट्रिक्ट ३१३२ ची १४ वी दोन दिवसीय कॉन्फरन्स शनिवार, दि. २१ मे व रविवार, दि. २२ मे २०२२ या कालावधीत लातूरच्या दयानंद सभागृहात पार पडणार आहे. या कॉन्फरन्सला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रेसर असणाऱ्या रोटरी परिवाराची ओळख नाही,अशी व्यक्ती आढळून येणे दुरापास्तच. रोटरी परिवारातील सदस्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरीच्या कार्याच्या आढाव्यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे.

लातुरात आयोजित करण्यात आलेल्या या कॉन्फरन्सला रोटरीचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून मुरादाबाद येथील ज्येष्ठ विधिज्ञ गजेंद्रसिंह धामा , पंतप्रधानांचे विशेष सल्लागार दीपक वोरा, राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जीएसटी आयुक्त सुरेंद्र मानकोसकर,पद्मश्री गिरीश प्रभूणे , हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर, विचारवंत – लेखक मोहिब कादरी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.
सदरची कॉन्फरन्स रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या नेतृत्वात होत आहे.

सदरची कॉन्फरन्स लातुरातील सर्व रोटरी क्लब व रोटरी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. कॉन्फरन्सच्या यशस्वीतेसाठी कॉन्फरन्स चेअरमन विष्णू मोंढे, महेंद्र खंडागळे, विनय जाजू, यशवंत हांडे, केदार कहाते, लक्ष्मीकांत सोनी, सुधीर लातूरे, रवींद्र बनकर यांसह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या कॉन्फरन्सला रोटरी परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन राजगोपाल मुंदडा, नाणिक जोधवानी, सुभद्रा घोरपडे, रवी हिंगणे, प्रा. संजय गवई यांनी केले आहे.