28.7 C
Pune
Monday, June 9, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*रोटरी आधार रुग्णसेवा लोकार्पित*

*रोटरी आधार रुग्णसेवा लोकार्पित*

रोटरी परिवार लातूर संचलित
रोटरी आधार रुग्णसेवा लोकार्पित

लातूर;दि.२७( वृत्तसेवा )-येथील ममता हॉस्पिटलच्या संचालिका व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. माया मधुकरराव कुलकर्णी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या ‘रोटरी आधार रुग्णसेवा केंद्राचा ‘ नुकताच शुभारंभ करण्यात आला .

  गरजू ,निराधार ,असहाय्य  लोकांचे अश्रू पुसण्याचे काम रोटरी संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येत असते . रुग्ण किंवा वृद्ध जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा गरजूंसाठी रोटरी क्लब परिवार संचलित रोटरी आधार रुग्णसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्याला वैद्यकीय उपकरणाची गरज आहे पण ज्यांच्याकडे ते विकत घ्यायला पैसे नाहीत किंवा पूर्ण भाडे भरणे शक्य नाही ,अशांसाठी या केंद्राच्या माध्यमातून मोफत किंवा कमीत कमी भाडे आकारुन  हे साहित्य गरजू लोकांना पुरविण्यात येणार आहे. या केंद्राच्या अध्यक्षा आहेत डॉ.माया कुलकर्णी .
      ममता हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एका छोटेखाणी  कार्यक्रमात या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रोटरी क्लब 3132 च्या प्रांतपाल स्वाती हेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णसेवा केंद्राचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. ममता हॉस्पिटलच्या संचालिका व रोटरी कॉपच्या अध्यक्षा डॉ. माया कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर रोटरीचे माजी प्रांतपाल विजयभाऊ राठी, रोटरी क्लब क्रॉपचे सचिव डॉ. गुणवंत बिरादार ,प्रोजेक्ट चेअरमन नागनाथ कलवले , रोटरीचे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमानी यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी डॉ. माया कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात रोटरी आधार रुग्ण सेवा केंद्र सुरू करण्यामागची भूमिका विषद केली. कुलकर्णी परिवारांच्या पुढारातून हे केंद्र सुरू करण्यात आले असले तरी रोटरी परिवारातील तसेच अनेक दानशूर लोकांनी या केंद्राला भरभरून अर्थसाह्य केल्यामुळे अल्पावधीतच हे रुग्णसेवा केंद्र उभे करता आले असे त्यांनी सांगून दातृत्व करणाऱ्या मंडळींचे ऋण व्यक्त केले .ज्यांना गरज आहे अशांसाठी या केंद्राच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत किंवा कमीत कमी भाडे आकारुन रुग्ण साहित्य पुरविण्यात येणार आहे. याचा लाभ वृद्ध , रुग्ण गरीब घरी काही कारणाने अंथरणावर पडून राहिलेले गरजू रुग्ण यांच्यासाठी होणार आहे असे त्या म्हणाल्या.


स्वाती हेरकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात लातूर रोटरी क्लब परिवाराचे मनापासून आभार मानले. महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे रोटरी क्लब आहेत त्यात लातूर रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय आहे आणि लातूर रोटरी क्लब परिवाराचा सामाजिक सेवेतील आदर्श इतर क्लबने घेण्यासारखा आहे ,असे सांगत त्यांनी रोटरी आधार रुग्णसेवा केंद्राला मनापासून शुभेच्छा दिल्या .हे रुग्णसेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या डॉ.माया कुलकर्णी यांच्याही त्यांनी आवर्जून उल्लेख करीत त्यांचे अभिनंदन केले.


प्रारंभी ममता हॉस्पिटलच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा व या केंद्राला मदत करणाऱ्या व्यक्तींचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महेंद्र दुरुकर , बी .आर. पाटील, जामंतराव सोनकवडे ,शशिकांत मोरलवार , सुनील कोचेटा ,रवींद्र बनकर, विशाल जैन, पुरुषोत्तम नोकजा ,विश्वनाथ सावळे,ज्योती मंगलगे , आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]