इचलकरंजी ता. 5 ऑगस्ट - रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप सोहळा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांच्या हस्ते आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.प्रोबसच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते नाकोडानगर भागात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात, प्रोबस क्लबने वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप करून पर्यावरण संवर्धनामध्ये जागृत आहोत हे दाखवून दिले असून ही बाब अभिनंदनीय आहे, असे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत क्लबचे उपाध्यक्ष शिवबसू खोत यांनी केले. पाहुण्यांची ओळख क्लबचे सेक्रेटरी सुनिल कोष्टी यांनी करुन दिली. प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे यांनी केले. प्रमुख अतिथी अशोक जैन यांचा सत्कार डी. एम. बिरादार यांनी तर अंबरीश सारडा यांचा सत्कार विजय पोवार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचा सत्कार प्रदीप लडगे यांनी केला. आभाराचे कार्य क्लबच्या जॉ. सेक्रेटरी वर्षा कुलकर्णी यांनी केले .सूत्रसंचालन क्लबच्या सौ. प्रमोदिनी देशमाने यांनी केले. यावेळी प्रमोद लडगे यांचा वाढदिवसानिमित्त डॉ. कुबेर मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. प्रकाश पाटील, दिलीप शेट्टी, सुरेश काजवे, रामचंद्र निमणकर , सौ. अरुंधती सातपुते, सौ. मनीषा कोष्टी, सौ. शालिनी जगदाळे, सौ.खुशनुमा ठगरी, सौ. जयश्री पुजारी, सौ. शैलजा सौदीमठ, सौ. ऋतुजा जोशी, सौ. अलका काटकर, सौ. कांचन चोथे, अॅड. विश्वास चुडमुंगे, सर्जेराव घोरपडे, जोतिराम जाधव, एम. के कांबळे, हेमंत कवठे, सौ. शारदा कवठे, काशिनाथ जगदाळे, सूर्यकांत बिडकर, गजानन सुलतानपुरे, प्रकाश अकीवाटे, महावीर कुरुंदवाडे, राजेंद्र मुठाणे यांच्यासह सभासदांची उपस्थिती होती.




