22.9 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeठळक बातम्या*लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ*

*लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ*

         लातूर :- लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि लातूर या बँकेची  २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  शनिवार, दि. ०६.०८.२०२२ रोजी भालचंद्र ब्लड बँक लातूर येथील सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाली.  

   सभेपुर्वी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांचेकडून प्राध्यापक श्री श्रीपती येळीकर यांनी  सहकार शिक्षण/ प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. ‌सभेची सुरुवात लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली, तसेच दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  सभेचे अध्यक्ष व बँकेचे चेअरमन  अशोक अग्रवाल यांनी  सभेचे प्रास्तविक व अहवाल वाचन केले. अशोक अग्रवाल यांनी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले. बँकेने  मागील काळात  केलेल्या प्रगतीचा आलेख हा सभागृहासमोर मांडला, ९ % लाभांश जाहीर करताच सभासदांनी टाळाच्या गजरात दाद दिली. बँकेकडून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी सभागृहास दिली, “आपल्या बँकेचे डिजिटल बँकिंग मध्ये रूपांतर होत असल्याचे” त्यांनी सांगितले. यावेळी मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. मोबाईल बँकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे त्यांनी सभासद व ग्राहकांना आवाहन केले, लवकरच IMPS, UPI ATM Debit Card  ची  सुविधाही सुरू करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

           बँकेला अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांचेकडून बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल  बँकेचे संचालक  लक्ष्मीकांत सोमाणी यांनी सर्व संचालक, सभासद, ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले व पुरस्कार सभागृहात सादर केला. 

      मागील काळात वैद्यकीय, पत्रकारिता व विधी क्षेत्रातील तब्बल ५० वर्षाच्या सेवेबद्दल बँकेकडून मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला,यात माजलगाव शाखेचे सल्लागार डॉ. प्रकाश आनंदगावकर, बँकेचे व्हा. चेअरमन सूर्यप्रकाश धूत व  जेष्ठ संचालक अँड धर्मवीर जाधव   यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देवुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश आळंदकर यांनी सभेचे विषय मांडले व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषयांना मान्यता दिली.

सभेसाठी बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सूर्यप्रकाश धूत, संचालक अॅड. धर्मवीर जाधव, सुरेशचंद्र जैन, लक्ष्मीकांत सोमाणी, अजितलाल आळंदकर, प्रल्हाद दुडिले, शशिकांत मोरलावार, विजय वर्मा, सतिष भोसले,सौ. माला भुतडा, तज्ञ संचालक तेजमल बोरा, किशोर भराडिया, सी. ए. संजय अग्रवाल, शाखा सल्लागार राधेश्याम लोहिया, डॉ.प्रकाश आनंदगावकर, प्रेमचंद भोरकर, उमाकांत रायवार, बालाजी कोंडावार, धिरेंद्र तिवारी, गणेश हेडडा,सभासद उत्तमराव मोहिते, हरिकिशन तोष्णीवाल, रामेश्वर तिवारी, चंद्रकांत पाटील, सुरेश ढमाले,अजय दुडीले, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, अधिकारी प्रताप जाधव, अनिता कातपुरे, सुशील जोशी, संतोष बनभेरु, दिनेश कांबळे, रविंद्र मदने, सुहास राजमाने, सिद्धेश्वर पवार तसेच बँकेचे सभासद, पिग्मी प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकेचे व्हा. चेअरमन सूर्यप्रकाश धूत यांनी आभार मानताना बँकेच्या वाटचालीत सर्व संचालक, सभासद, ग्राहक,सहकार विभागातील अधिकारी, भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,पिग्मी प्रतिनिधी व कर्मचारी यांचा खूप मोठा वाटा असल्याचे नमूद केले. बँकेचे अधिकारी सुशिल जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]