लातूर ; दि.१८
मराठवाड्यातील नामांकित लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर या बँकेस अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बँकिंग क्षेत्रातील अतिशय नावाजलेला व मानाचा “बँको ब्ल्यू रिबीन” पुरस्कार सन २०२१ करिता लक्ष्मी अर्बन बँकेची निवड झाल्याचे पत्र बँकेस प्राप्त झालेले आहे. सहकार क्षेत्रातील बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने या पुरस्काराचे आयोजन केले जाते. सदर पुरस्काराची तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार बँकेची निवड झालेली आहे. बँकेने मागील काळात आधुनिक बँकिंग सेवा देण्यामध्ये पुढाकार घेतला आहे, तसेच ग्राहकांसाठी “ ग्राहक संपर्क अभियान” राबवणारी मराठवाड्यातील हि पहिली बँक आहे. सामाजिक क्षेत्रातही बँकेने आजपर्यंत अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.
बँकेच्या रोप्यमहोत्सवी वर्षात पुरस्कार मिळाल्याने बँकेस अभिमान वाटत आहे. लवकरच लोणावळा येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. बँकेस “बँको ब्ल्यु रिबीन” पुरस्कार घोषित झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सुर्यप्रकाश धुत ,सर्व संचालक मंडळ, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, तसेच बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.