लातुरात परशुराम जयंती जल्लोषात साजरी ६० जणांनी केले रक्तदान; शोभायात्रा

0
397


लातूर, दि. ४-

 भगवान परशुराम जयंती उत्सव २०२२ समितीच्यावतीने राजराजेश्‍वर भगवान परशुराम यांची जयंती विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरी करण्यात आली. व्याख्यान, रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रमांबरोबर परशुराम याग, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.


भगवान परशुराम जयंती निमित्त सकाळी बार्शी रस्त्यावरील परशुराम पार्क येथील परशुराम मंदिरात मंत्रोच्चारात पौरोहित्यांनी दुग्धाभिषेक, परशुराम याग, मंत्रोच्याराचे पठण केले.यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. संजय पांडे यांच्या हस्ते परशुरामाच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. यानंतर मंगल आरती करण्यात आली. यावेळी यंदाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष उद्योजक प्रवीण कस्तुरे, संजय निलेगांवकर, अजित म्हैसेकर, संतोष कुलकर्णी, जगदीश कुलकर्णी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
६० जणांचे रक्तदान


परशुराम जयंती निमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते पी. एम. कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली गत दहा वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. कोरोना प्रतिबंधामुळे दोन वर्षे या शिबिरात खंड पडला होता. रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. यात विक्रमी रक्तदान करणारे सेवानिवृत्त अभियंता महेंद्र जोशी यांचा समावेश होता. लक्ष्मी कॉलनी मधील विवेकानंद संस्कार संस्थेच्या कार्यक्षेत्रात संपन्न झालेल्या या शिबिरात १७० जणांची बोन डेन्सीटी तपासणी करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शोभायात्रेस प्रतिसाद

परशुराम जयंती निमित्त लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. परशुराम जयंती उत्सव समिती २०२२ चे अध्यक्ष प्रवीण कस्तुरे व सुमुख गोंविदपूरकर, मनोज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दूचाकी रॅली काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या जीववर प्रवीण कस्तुरे भगवे फेटे परिधान करून व हाती भगवे ध्वज घेवुन उभे होते. यावेळी भगवान परशुरामांचा जयघोष करण्यात आला. कोरोना प्रतिबंधामुळे गेले दोन वर्षे शोभायात्रा व दूचाकी रॅली काएण्यात आली.नव्हती. यंदा प्रतिबंध हटवण्यात आल्यामुळे दूचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी तरूणांमध्ये उत्साह दिसून येत होता. महिला देखील या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.


दुपारी रामगल्ली भागातील कशेवराज मंदीर येथून या रॅलीस प्रारंभ झाला. सुभाष चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंदी स्टॉप, राजीव गांधी चौक, पुन्हा शिवाजी चौक, बार्शी रस्त्यावर फिरून ही दूचाकी रॅली परशुराम पार्क येथे विसर्जित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here