कालपर्यंत खारीमुरी, भजी, अंडा भुर्जी, ऑम्लेटच्या उग्र वासाने भणभण उठलेला व अस्ताव्यस्त दुचाकी-तिचाकींनी अजागळ दिसणारा जुना रेणापूर नाक्यावरचा कोपरा आता एलईडीच्या दिव्यांनी झगमगून गेलेला दिसू लागला आहे. गेल्या दीडेक वर्षांपासून इथं काही तरी उभं होतंय असं जाणवत होतं. ती इमारत आता पूर्ण होऊन लोकांसाठी खुली झाली आहे.

अंबाजोगाई रस्त्यावरील रेणापूर नाक्यावरची ही जागा राजकुमारजी अग्रोया यांच्या मालकीची. अग्रोयाशेठ हे यशस्वी व्यावसायिक असून त्यांना लातूरकर ओळखतात ते प्रामुख्याने ‘यशोदा’ या सुंदर व अद्ययावत चित्रपट गृहाचे चालक-मालक. तसेच कलाकुसरयुक्त सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व सचोटीने व्यापार करणारे व्यावसायिक म्हणूनही ओळखल्या जाते. एक मितभाषी व मधुर स्वभावाचे व्यापारी असणाऱ्या राजकुमार अग्रोया यांच्या पुढाकाराने लातुरात ‘WESTSIDE’चे एक सुरेख, अद्ययावत, वातानुकुलीत दालन लोकसेवेत अर्पण केले जात आहे.

राजकुमारजी अग्रोया यांनी ‘WESTSIDE’च्या अतिशय देखण्या इमारतीची उभारणी स्वतः जातीने देखरेख करून केली आहे व या इमारतीचे नामकरण ‘यशराज इस्टेट’ असं इमारतीला साजेसं केलेलं आहे. राजकुमारजी अग्रोया यांनी ‘यशराज इस्टेट’ इमारत दिवंगत मातोश्री श्रीमती यशोदा अग्रोया आणि दिवंगत पिताजी श्री. सत्यनारायणजी अग्रोया शेठ यांना समर्पित केली आहे.
लातुरात अद्यापपर्यंत कुठल्याही बहुमजली इमारतीत ‘एस्केलेटर्स’ अर्थात स्वयंचलित पायऱ्या संकल्पना साकारलेली नव्हती. ती ‘यशराज इस्टेट’च्या निमित्ताने ‘WESTSIDE’मध्ये साकारण्यात आलेली आहे आणि लातूरकरांना ‘एस्केलेटर्स’ नाविन्यपूर्ण वाटणार आहे, यात शंका नाही.

ट्रेंट ‘WESTSIDE’ ब्रँड्स हा टाटा उद्योग समूहाचा एक भाग असून तो १९९८ पासून लोकप्रिय आहे. भारतात मूळ धरलेल्या खुदरा व्यापारापैकी ट्रेंट WESTSIDE’ हा सर्वात मोठा आहे. वैविध्यपूर्ण वस्तु, वस्त्र प्रावरणे, शोभेचे दागिने, सँडल्स, बुट्स, गृहोपयोगी साहित्य आदींसह सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दर व आकर्षकता या प्रमुख गुणविशेषामुळे तरुण वर्गात अधिक वेगाने लोकप्रिय झाला आहे.
काही तरी नवं देण्याचा प्रयत्न लातुरात नेहमीच केला जातो. ‘WESTSIDE’चे आधुनिक दालन हेही त्यापैकीच एक. जवळपास सात हजार चौरस फूट आकाराचे दोन भव्य दालनात तरुण, तरुणींसह सर्व वयोगटातील लोकांच्या व्यक्तिमत्वात भर टाकेल अशा सर्व प्रकारचे तयार कपडे व अन्य वस्तू एकाच छताखाली व सर्वसामान्य लातूरकरांचा खिशाला परवडणाऱ्या दरात मिळण्याचे ठिकाण म्हणजेच ‘WESTSIDE’ दालन होय.

काय मिळेल इथं…?
महिलांच्या आवडीची ब्रँडेड एथनिक व वेस्टर्न पेहराव, तयार कपडे, ब्रँडेड लिंगरीज, स्लीपविअर्स, लोंजविअर्स,
तरुण मुले व पुरुषांसाठी ब्रँडेड
कॅज्युअल व फॉर्मल शर्टस व ट्रोउजर्स, टी शर्टस, पोलोज,एथनिक विअर्स, जीन्स, जॉगर्स, शॉर्टस, ब्लेझर्स, सूटस, जॅकेट्स, विंटरविअर्स, स्वेटशर्टस…
नवजात बाळापासून लहान मुले व पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी सर्व प्रकारची ब्रँडेड तयार कपडे, बुट्स, चप्पल, सँडल्स, स्पोर्ट्स शूज, खेळणी इत्यादी…
महिला व मुलींच्या आवड व जिव्हाळाच्या व आकर्षक व्यक्तीमत्वाला अधिक भर टाकण्यास मदत होईल अशा सौंदर्य प्रसाधनांचे स्वतंत्र दालनही ‘WESTSIDE’चे वैशिष्ट्य आहे. ब्रँडेड लिपस्टिक्स, नेलपॉलिश, नेलकेअर, काजळ, आयशॅडो, मस्कारा,आय लायनर्सची रेलचेल असणार आहे. फौंडेशन, BB क्रीम्स, काँसेलर, प्रायमर, कंपेक्ट, हायलायटर, ब्लुश, मेकअप रिमूव्हर,
बॉडी स्प्रे, पर्फ्यूम्स….
मुलींसाठी सँडल्स प्रकारात फ्लॅट, हाय हिल्स, कंफोर्टबल, फ्लिपफ्लॉप, स्लीपर्स. लहान मुले व तरुणांसाठी ‘WESTSIDE’मध्ये व्हरायटीला कमतरता नाही. कमरेचे बेल्टस, लेदर्स बॅग्स आकर्षक व्यक्तिमत्वात भर पडणार आहे…
घरामध्ये नियमितपणे वापराच्या
रेडिमेड गारमेंट्स, कॉस्मेटिक्स, फूट विअर्स, लहान मुले, तरुण तरुणीसाठी ‘WESTSIDE’ म्हणजे एक पर्वणी आहे. विशेष म्हणजे हे सगळे सामान्य लातूरकरांच्या खिशाला परवडणारे व आवडणारे अशा वस्तू, साहित्य मिळण्याचे ‘WESTSIDE’ हे लातुरातले पहिलेच दालन असणार आहे. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे वातानुकूलित असे भव्य ‘WESTSIDE’ दालन लातूरकरांचा पसंतीला नक्कीच उतरेल…!

‘WESTSIDE’ हे मराठवाड्यातले पहिले व एकमेव असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूर या शहरानंतर ‘WESTSIDE’ दालन लातूर येथेच सुरू झालेले आहे. लातूरकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त करून राजकुमारजी अग्रोया ‘राजूशेठ’ यांनी लातूरकरांनी अग्रोया परिवारावर मनापासून प्रेम केले आहे. विश्वास ठेवला आहे. तो विश्वास जपण्याचा व अधिक वृद्धींगत करण्याचा संकल्प करून WESTSIDE’च्या माध्यमातून लातूरकर व परिसरातील ग्राहकांच्या स्वागतास उत्सूक असल्याचे म्हटले….!
( साभार:विजयकुमार स्वामी यांच्या फेसबुक पोस्ट वरुन)




