●टँकरद्वारे दररोज झाडांना पाणी देऊन शहर हिरवंगार ठेवलं, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सातत्यपूर्ण कार्य●
◆या कामाचे संपूर्ण श्रेय *ग्रीन लातूर वृक्ष टीम* च्या प्रत्येक सदस्याचे आहे.◆
■काही लोकांनी संपूर्ण लातूरकरां करिता लातूरकरांचे मदतीने/सहकार्याने उभी केलेली हरीत चळवळ म्हणजेच *ग्रीन लातूर वृक्ष टीम* होय.■
लातूर ; दि. १९ ( प्रतिनिधी ) –—
शासनाच्या मदतीशिवाय केवळ दानशूर लातूरकरांच्या देणगीतून या असाह्य उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी देऊन लातूर हिरवेगार करणारी टीम म्हणजे *ग्रीन लातूर वृक्ष टीम*.
ग्रीन लातूर वृक्ष टीम ही शहरांमध्ये झाडे लावणे, झाडे जगवणे हे कार्य मागील १४४९ दिवसांपासून सातत्याने, अविरतपणे,अखंडपणे करत आहे. पावसाळ्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी झाडे लावायची, हिवाळ्यामध्ये झाडांची जोपासना करायची, झाडांचे संगोपन करायचे, आणि उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याचे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून केले जात आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यापासून पूर्ण उन्हाळ्यामध्ये ते आज पर्यंत दररोज चार तास श्रमदान करून झाडांना दररोज सरासरी किमान तीन टँकरच्या द्वारे पाणी देऊन जगवले जात आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात टँकर नेऊन ग्रीन लातूर वृक्ष टीम झाडांना पाणी देत आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून लातूरकरांना आव्हान करण्यात आले होते की, तुमच्या परिसरात झाडांना पाणी मिळत नसेल, झाडे सुकत असतील, तर ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांना संपर्क करा व झाडांना पाणी टाकण्याची मागणी करा. तुम्हाला पाणी टँकर पुरवले जाईल. अशा पद्धतीने शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते गरुड चौक, स्वामी विवेकानंद चौक ते बाभळगाव रस्ता, स्वामी विवेकानंद चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक, छत्रपती शाहू महाराज चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, महात्मा गांधी पुतळा परिसर, महात्मा गांधी चौक ते तहसील कार्यालय, जुन्या रेल्वे रस्त्यावरील झाडे, भुयारी मार्गातील झाडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडे, बार्शी रोड वरील झाडे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिडवे इंजिनिअरिंग पलीकडे रेल्वे लाईन पर्यंतची झाडे, संपूर्ण अंबाजोगाई रस्ता, बस स्थानक परिसरातील झाडे, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील झाडे, शहरात विविध ठिकाणी लावलेली झाडे जशी स्मशानभूमी कब्रस्तान, पशुवैद्यकीय, चिकित्सालयातील झाडे, जिल्हा परिषद मधील झाडे, न्यायालय, पोलीस स्टेशन, मियावोकी प्रकल्पातील झाडे, काही शाळा, महाविद्यालयातील झाडे, ग्रीन बेल्ट , राणी अहिल्याबाई होळकर चौक ते मेडिकल कॉलेज रस्त्यावरील झाडे, पीव्हीआर चौक ते छत्रपती चौकरिंग रोडवरील झाडे ही सर्व झाडे रोटेशन पद्धतीने टँकरद्वारे पाणी देऊन जगविण्यात आली आहे.

याचा उत्तम असा परिणाम दिसून आला आहे.शहरातील झाडांची संख्या लक्षणीय रित्या वाढलेली आहे. शहरांमध्ये सगळीकडे हिरवळ दिसून येत आहे, शहरांमध्ये आजूबाजूच्या इतर शहरांच्या तापमानाच्या तुलनेत शहराचे तापमान एक ते दोन डिग्रीने कमी झालेले आहे. लातूर शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवगार दिसत आहे. अशा पद्धतीने जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत जवळपास लहान-मोठी ३०० टँकर वा त्यापेक्षा ही अधिक टँकर द्वारे पाणी देऊन शहर हिरवगार ठेवण्यात ग्रीन लातूर वृक्ष टीम च्या सदस्यांना यश आलेल आहे. या मध्ये ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, माजी नगरसेवक इमरान सय्यद, डॉ. भास्कर बोरगावकर, पद्माकर बागल, ऍड. वैशाली यादव, बाळासाहेब बावणे, दयाराम सुडे, मुकेश लाटे, नागसेन कांबळे, अभिषेक घाडगे, आकाश सावंत, विजय मोहिते, राहुल माने, सिद्धेश माने, सीताराम कंजे, महेश गेलडा, कल्पना कुलकर्णी, मीनाक्षी बोंडगे, दिपाली राजपूत, तुलसा राठोड, विजयकुमार कठारे,अरविंद फड, समृद्धी फड, शुभम आवाड, अमोल बिराजदार, गणेश सुरवसे, मोईज मिर्झा, पूजा पाटील, रोहिणी पाटील, विदुला राजेमाने, कपिल काळे, बळीराम दगडे, अविनाश मंत्री, विकास कातपुरे, दीपक नावाडे, कांत मरकड, नीता कानडे, डॉ विमल डोळे, हर्षदा बाचेपल्लीकर, पुष्पा कांबळे, गायत्री वकील, मच्छिंद्र चाटे, नितीन कामखेडकर, खाजा पठाण, मनीषा कोकणे, प्रिया नाईक, प्रतीक्षा कल्याणकर, सोमनाथअप्पा चिल्लरगे, अभिजित चिल्लरगे, आकाश चिल्लरगे, रतन ,सिया लड्डाराजलक्ष्मी लड्डा राज नंदिनी लड्डा, सूरज साखरे, नितीन पांचाळ, भगवान जाभाडे, मोहिनी देवनाळे, विक्रांत भूमकर, कृष्णा वंजारे, नारायणकर, बालाजी उमरदंड, शंकरसेन पाटील, शेषेराव पवार, वैशाली इंगोले हे सर्व वृक्षप्रेमी लातूर हिरवेगार करण्यामध्ये सहभागी होतात.ग्रीन लातूर वृक्ष टीम म्हणजे झाडांचं रक्षण करणारी टीम म्हणून ओळखली जाते.





