लातूर (प्रतिनिधी):- लातूर शहरातील जिल्हा परिषद ते पाच नंबर चौक या रस्त्यावरील फुलझाडे वेड्यावाकड्या पद्धतीने वाढली होती .त्यामुळे रहदारीस अडचण येत होती .ही वाढलेली झाडे काढून टाकण्यात आल्यामुळे दुभाजकांनी मोकळा श्वास घेतला आहे

लातूरमधील दुभाजकात टिकोमा, बोगनवेल, बिट्टी, कनेरी अशी वेगवेगळी फुलझाडे ग्रीन लातूर वृक्ष सदस्यांनी लावली आहेत. यांना वेळच्या वेळी छाटावे लागते, शहर सुशोभित दिसावे या करिता आकार द्यावा लागतो.जिल्हा परिषद ते पाच नबर चौक दुभाजकातील फुलझाडे वेड्या वाकड्या पद्धतीने वाढली होती, खांबावरील लाईटचा उजेड रस्त्यावर येत नव्हता, दुभाजकाच्या बाहेर दीड ते दोन फूट झाडांच्या फांद्या आल्या होत्या, त्यामुळे वाहतुकीला अडचण होत होती, सोबतच दुभाजकांमध्ये बाभळीची, शिवरीची झाडे ही मोठ्या प्रमाणात वाढली होती,दुभाजकाच्या बाहेर आलेल्या फांद्यांमुळे अपघात होत होते, अपघाताची शक्यता वाढली होती. तसेच रस्ता ओलांडणाऱ्यांना येणारी वाहने झाडांमुळे दिसत नव्हती.या सर्व कारणांचा विचार करून ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी मंगळवार व बुधवार दोन दिवस श्रमदान करून संविधान चौक ते जिल्हा परिषद पर्यंत दुभाजकातील झाडांच्या छाटण्या करून त्यांना आकार दिला.

येत्या पंधरा दिवसात छाटलेल्या सर्व फुलझाडाना नवीन बहार येईल व दुभाजक सुंदर दिसेल.दुभाजकातील बाभळीसारखी अनावश्यक झुडपे कापून काढली, दुभाजक स्वच्छ केले.दुभाजकातील वाढलेल्या वेड्यावाकड्या झाडीमुळे दुभाजकात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात होता. दुभाजकाच्या उंचीपासून तीन ते चार फूट पर्यंत शोभिवंत झाडांची उंची असायला हवी, दहा बारा फुटापर्यंत ही शोभिवंत झाडे वाढली होती तरीही प्रशासनाकडून यांच्या छाटणी केली जात नव्हती.घराघरांमध्ये गुलाब मोगरा जास्वंद कनेरी जाई जुई चमेली अशी फुलझाडे असतातपावसाच्या सुरुवातीला, हिवाळ्यामध्ये फुलांचा बहार गेल्यानंतर वेळोवेळी छाटण्या केल्या जातात त्याच पद्धतीने शहरातील फोफावलेल्या झाडांच्या वेळोवेळी छाटण्या मनपा लातूर उद्यान विभागाने कराव्यात अशी विनंती आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.सध्या सर्व हाय वे वरील दुभाजकातील झाडांच्या छाटण्या सुरू आहेत. कित्येक ठिकाणी बुडापासून फक्त एक फूट खोड शिल्लक ठेवून फुलझाडे शोभिवंत झाडे छाटली जातात. दुभाजकातील झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. नियमित छाटणी केल्याने झाड निरोगी राहते आणि ते व्यवस्थित आकारात राहते. तसेच, यामुळे अपघात टाळता येतात आणि शहराचे सौंदर्य वाढते. छाटणीमुळे झाडांना योग्य आकार मिळतो आणि त्यांची वाढ चांगली होते. यामुळे झाड निरोगी राहते, झाडांच्या फांद्या छाटल्यामुळे लोकांना चालताना किंवा वाहनाने जाताना अडथळा येत नाही.




