29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*लातूरात आगळा वेगळा उपक्रम*

*लातूरात आगळा वेगळा उपक्रम*

पेडल फॉर नेशन ‘ मध्ये 750 सायकलिस्ट सहभागी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘ दीपस्तंभ ‘ चा उपक्रम

लातूर; दि. १६( माध्यम वृत्तसेवा ) – ”भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील ‘दीपस्तंभ ‘ परीवाराच्या वतीने आयोजित ‘ पेडल फाँर नेशन – २०२२ ‘ या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील 750 स्त्री- पुरुष सायकलिस्टनी सायकल चालवून स्वातंत्र्याला अभिवादन केले . अशा प्रकारचा हा देशातील सर्वात मोठा इंव्हेंट होता असेच म्हणावे लागेल .


भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ पेडल फाँर नेशन – 2022 ‘ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , पहाटे 5. 30 वाजता बिडवे लाँन येथून या उपक्रमात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. उप जिल्ह्याधिकारी गणेश महाडिकआणि यांनी हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला .75 किलोमीटर , 50 किलोमीटर , 25 किलोमीटर आणि 10किलोमीटर अंतर पार करण्यासाठी भल्या पहाटेपासून मुले – मुली , शाळकरी तरुण – तरुणी व त्यांचे पालक राजीव गांधी चौकाजवळील बिडवे लॉन येथे जमा झाले होते. तिरंगा ध्वज , फुगे , कट आउट्स , सेल्फी पॉईंट , ढोल ताशे अशा विविध स्वरूपाने हा परिसर तिरंगामय व देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला होता.


या उपक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आणि वाँर्मअप साठी सायकलिस्ट कडून प्रिती निसार यांच्या ग्रुपने झुंबा नृत्य करवून घेतले. .चिमुकले, तरुण-तरुणी उत्साहात यात सहभागी झाले होते . दीपस्तंभ परीवाराचे पदाधिकारी , स्वयंसेवक , राजश्री शाहू महाविद्यालयातील प्रा. अनिरुद्ध बिराजदार व विद्यार्थी , शैलेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालील एजडी जावा चालक , वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलीस आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले .तसेच बावगे फिजिओथेरपी काँलेजच्या चमूने सायकलिस्टना फिजिओथेरपी साठी सहकार्य केले. . विवेकांद वैद्यकीय प्रतिष्ठान व दिशा प्रतिष्ठानने फिरता दवाखान्याची अंबुलन्स व डॉक्टर घटनास्थळी तैनात करून सहकार्य केले .अतिशय शिस्तबद्ध व नियोजन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला याबद्दल दीपस्तंभ ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.


राजीव गांधी चौक ते नवीन रेणापूर नाका या रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लातूरकरांनी सायकलिस्टवर पुष्पवृष्टी करून, टाळ्या वाजवून आणि भारतमातेचा जयघोष करून सगळ्यांना प्रोत्साहित केले .ठरवून दिलेले अंतर कापून परत बिडवेलाँन येथे आलेल्या सर्वच सायकलिस्ट यांना मान्यवरांच्या व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते पदक व प्रशस्त्री पत्रकाचे वितरण करण्यात आले . ‘दीपस्तंभ ‘चे अध्यक्ष योगेश कर्वा ,सचिव डॉ. अजय पुनपाळे, प्रमोद भोयरेकर, अमोल चव्हाण,ओमप्रकाश झुरळे , सोनू डगवाले , , शैलेश रेड्डी, व्यंकटेश पवार, रवी सौदागर , प्रा. शिवराज मोटेगांवकर, तुकाराम पाटील, संतोष बिराजदार, व्यंकटेश पवार, रितेश लोया , पप्पू कर्वा , यश कुलकर्णी आदींनी सायकलिस्टना पदकाचे वितरण केले. प्रतिक्षा चव्हाण आणि बालाजी सूळ यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]